शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंत्र्यांना मिरच्यांचा धूर; एनएसयूआयचे अनोखे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 19:13 IST

उच्च शिक्षणाच्या अनुषंगाने प्रश्न करणा-या विद्यार्थ्यांना अटक करण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले, त्याच्या निषेधार्थ एनएसयूआयच्या वतीने शिक्षण मंत्र्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस मिरच्याचा धूर देण्यात आला.

लातूर - उच्च शिक्षणाच्या अनुषंगाने प्रश्न करणा-या विद्यार्थ्यांना अटक करण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले, त्याच्या निषेधार्थ एनएसयूआयच्या वतीने शिक्षण मंत्र्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस मिरच्याचा धूर देण्यात आला. सोमवारी दयानंद गेटसमोर झालेल्या या अनोख्या आंदोलनात एनएसयुआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेत काही विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात शिक्षणमंत्र्यांना प्रश्न केले. मोफत उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून देता येईल का, हा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला व त्याचे चित्रिकरण केले. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी ‘तुला झेपत नसेल तर शिकू नको, नोकरी कर’ असे अफलातून उत्तर दिले. शिवाय, चित्रिकरण करणा-या विद्यार्थ्यांना अटक करा, असे आदेश दिले. त्याच्या निषेधार्थ एनएसयुआयने आज लातूरमध्ये मिरच्याचा धूर देऊन या घटनेचा निषेध नोंदविला. विद्यार्थी हा देशाच्या भवितव्याचा कणा आहे. हा कणा मोडण्याचा प्रयत्न शिक्षण मंत्री व सरकार करीत आहे. अभ्यासक्रमातून जाणूनबुजून पाठ्यपुस्तकामध्ये चुकीचे मजकूर छापले जातात. इतिहास बदलण्याचा त्यांचा डाव आहे. ही पद्धत हुकूमशाहीकडे वाटचाल करणारी आहे. म्हणून एनएसयुआयने शिक्षणमंत्र्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस मिरच्याचा धूर देत अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात एनएसयुआयचे शहर जिल्हाध्यक्ष शरद देशमुख, शहराध्यक्ष रोहित पाटील, निखिल लोकरे, इम्रान सय्यद, ऋषी मोरे, सूरज पाटील, परमेश्वर घुटे, शुभम चव्हाण, किरण देशमुख, विशाल इरळे आदींचा समावेश होता.  

अनोखे आंदोलन... एनएसयुआयच्या वतीने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या वक्तव्याचा सोमवारी लातुरात निषेध करण्यात आला. शिक्षण मंत्र्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस मिरच्याचा धूर देऊन हे अनोखे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात एनएसयुआयचे शहर जिल्हाध्यक्ष शरद देशमुख, शहराध्यक्ष रोहित पाटील, निखिल लोकरे, इम्रान सय्यद, ऋषी मोरे, सूरज पाटील, परमेश्वर घुटे, शुभम चव्हाण, किरण देशमुख, विशाल इरळे आदींचा समावेश होता. 

टॅग्स :laturलातूरVinod Tawdeविनोद तावडे