शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

रिपब्लिकन ऐक्यासाठी दोन पावले मागे; प्रकाश आंबेडकरांनी नेतृत्व करावे: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 16:59 IST

मी मंत्रिपदाच्या मागे नाही, ज्यांच्यासोबत जातो त्यांची सत्ता येते

लातूर : राज्यात आता कोणत्याही एका पक्षाचे सरकार येणार नाही. आघाडी करूनच सत्ता मिळवावी लागणार आहे. या सत्तेमध्ये आंबेडकरी पक्ष समुहांनी मागे राहू नये. राजकीय पक्षांसोबत हातमिळवणी करून सत्तेत गेले पाहिजे.  आंबेडकरी पक्षांचे ऐक्य हवे. प्रकाश आंबेडकरांनी ( Prakash Ambedkar ) ऐक्याचे नेतृत्व करावे. त्यासाठी मी दोन पावले मागे यायला तयार आहे, असे मत केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale ) यांनी येथे बुधवारी व्यक्त केले. 

रामदास आठवले म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट निर्माण झालेले आहेत. यामुळे सत्ता मिळू शकणार नाही. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीलाही सत्ता मिळू शकत नाही. त्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल. रिपब्लिकन ऐक्य घडवावे लागेल. मात्र, प्रकाश आंबेडकर त्यासाठी तयार नाहीत. एकत्रित आंबेडकरी पक्षाचे नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी करावे. मी त्यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहे. मंत्री पदाच्या अथवा सत्तेच्या मी मागे नाही. परंतु, मी ज्यांच्यासोबत जातो तो पक्ष सत्तेत येतो आणि मलाही मंत्रीपद मिळते, असेही ते म्हणाले. बसपा पक्ष बॅकफूटवर गेलेला आहे. त्यामुळे आता देशात बसपाची जागा रिपाइं घेत आहे. उत्तर प्रदेशमध्येही रिपाइंच राहणार आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आत्मनिर्भर होत आहे. तरुणांनी आत्मनिर्भर योजनेअंतर्गत वेगवेगळे रोजगार उभे करून स्वत:च्या पायावर उभे टाकले पाहिजे. पत्रपरिषदेला खा. सुधाकर शृंगारे, चंद्रकांत चिकटे यांची उपस्थिती होती. 

भोंगे उतरविण्याच्या राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध... आपल्या देशात लोकशाही आहे, याचे भान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठेवावे. मस्जिदीवरील भोंगे उतरविण्याची जी त्यांनी भूमिका घेतली आहे, त्याला आमचा विरोध आहे. तुम्हाला मंदिरात भोंगे लावायचे असेल तर लावा, मस्जिदीवरील भोंग्यांना तुमचा विरोध कशासाठी, असा सवालही आठवले यांनी केला. 

शरद पवार पुरोगामी नेते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एका सभेमध्ये शरद पवार यांच्यावर जातीयवादी असल्याचा आरोप केला. याबाबत आठवले म्हणाले, राज ठाकरे यांचा तोल गेलेला आहे. शरद पवार पुरोगामी नेते आहेत. ते जातीयवादी नाहीत. त्यांनी आपल्या राजकारणामध्ये नेहमीच धर्मनिरपेक्ष भूमिका मांडलेली आहे. त्यांना जातीयवादी म्हणणे चुकीचे आहे, असेही आठवले म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरlaturलातूर