शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एक ट्रॅक्टर, चार दुचाकीसह पाेलिसांकडून दाेघांना अटक

By राजकुमार जोंधळे | Updated: April 21, 2023 20:07 IST

स्थागुशाची कारवाई : लातूरसह पुणे जिल्ह्यातही वाहनचाेरी...

लातूर : एक ट्रॅक्टर, चार दुचाकीसह दाेघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, त्यांच्याकडून जवळपास साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, सखाेल चाैकशीतून चार गुन्हे उघड झाले आहेत.

लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत वाहनचाेरी बराेबरच इतर चाेरीच्या घटना अलिकडे वाढलेल्या आहेत. यातील आराेपींच्या अटकेसाठी विविध पथकांकडून प्रयत्न सुरु आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून यातील आराेपींचा शाेध घेण्याचा प्रयत्न सुरु हाेता. दरम्यान, गांधी चौक पाेलिस ठाण्यात दाखल चाेरीच्या गुन्ह्यातील दुचाकी लिंबाळा दाऊ गावातील एका तरुणाकडे असल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे स्थागुशाचे पथक लिंबाळा दाऊ (ता. औसा) गावात धडकले. घरासमोर दुचाकीसह थांबलेल्या व्यक्तीला विश्वासात घेत विचारपूस केली असता, त्याने मल्लिनाथ ऊर्फ गोट्या रतन धुळे (वय २७, रा. हासेगाव, ता औसा) असे नाव सांगितले. अधिक चाैकशी केली असता, दुचाकी लातूर शहरातून चोरल्याची कबुली दिली.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सोमया मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, पोलिस अंमलदार अंगद कोतवाड, नवनाथ हासबे, राजेश कंचे, तुराब पठाण, राहुल कांबळे, मनोज खोसे, चंद्रकांत केंद्रे यांच्या पथकाने केली.

लातूर, पुणे जिल्ह्यात केली वाहनांची चाेरी...लातूरसह पुणे जिल्ह्यातून साथीदार पप्पू शामराव लाळे (रा. हसेगाव ता. औसा) यांनी वाहनांची चाेरी केली. त्यानुसार आरोपींना अटक करुन, चाेरी केलेल्या एकूण चार दुचाकी जप्त केल्या. तर तीन वर्षांपूर्वी शिरूर अनंतपाळ ठाण्याच्या हद्दीतून ट्रॅक्टर आणि ट्रॉलीची चोरी केली हाेती. ताे ट्रॅक्टर नरेंद्र विठ्ठल मुरटे (वय ४३ रा. कोंड जागजी जि. धाराशिव) यांना विक्री केल्याची कबुली दिली.

टॅग्स :laturलातूर