उदगीर : येथील रुग्णालयात रविवारी नवीन २ कोरोनाबाधित आढळले आहेत तर यशस्वी उपचारानंतर ६ जणांना घरी सोडण्यात आले.
येथील कोविड रुग्णालयात रविवारी आरटीपीसीआर तपासणीत एक आणि ॲन्टिजन तपासणीत एक असे दोघे कोरोनाबाधित आढळले. तर यशस्वी उपचारानंतर ६ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या कोविड रुग्णालयात ५, अरुणा अभय ओसवाल संस्थेत १, पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात १, तोंडार पाटी येथील कोविड केअर सेंटरमध्ये १५, जय हिंद पब्लिक स्कूल येथील कोविड केअर सेंटर येथे ११, विविध खासगी कोविड रुग्णालयात ४ तसेच गृह अलगीकरणामध्ये ३ अशा एकूण ४० बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती उदगीरच्या कोविड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे यांनी दिली.
सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. शासन नियमांचे पालन करावे, तोंडावर मास्क लावावा, फिजिकल डिस्टन्स राखावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.