लामजना ते निलंगा रोडवर अमन बशीर शेख यांच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एम.एच. २४ यु. ४०५९ या क्रमांकाच्या दुचाकी चालकांने जोराची धडक दिली. या अपघातात अमन शेख यांच्या डाव्या कमरेस तसेच तोंडाला, डोक्यात गंभीर मार लागला. फॅक्चरही झाले. तसेच मोटारसायकलवर मागे बसलेल्या अशोक घोलप यांना पण गंभीर मार लागला असून दोघांच्या जबाबावरून किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. शिंदे करीत आहेत.
दुचाकीच्या अपघातात दोघे जखमी; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:31 IST