शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाढवळ्या वाटमारी करणाऱ्या टोळीतील दाेघांच्या मुसक्या आवळल्या

By राजकुमार जोंधळे | Updated: February 28, 2023 18:27 IST

खबऱ्याने पथकाला टीप दिली अन् दाेघे पाेलिसांच्या जाळ्यात अलगद अडकले.

लातूर : कार अडवून चालकाला जबर मारहाण करत वाटमारी करणाऱ्या टाेळीतील दाेघांच्या पाेलिसांनी मंगळवारी मुसक्या आवळल्या. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून माेबाइल, राेख रक्कम जप्त केली आहे. ही घटना लातुरातील मळवटी रिंगराेड परिसरात २२ फेब्रुवारी राेजी घडली हाेती. दरम्यान, याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, बुधवार (२२ फेब्रुवारी) रोजी दुपारी १:३० वाजता दाेघा अज्ञातांनी एका कार चालकाला मळवटी रिंगराेड परिसरात अडवून मारहाण केली. चालकाकडील मोबाइल आणि रोख रक्कम हिसकावत पळ काढला. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या गुन्ह्याच्या तपासाचे आदेश पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले हाेते. त्यानुसार विवेकानंद चौक पाेलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने आराेपींचा माग काढला. फिर्यादीने सांगितलेल्या घटनाक्रमानुसार, वर्णनावरून ठाण्याच्या रेकाॅर्डवर असलेल्या आराेपींची चाचपणी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पाेलिस पथकाला खबऱ्याकडून माहिती मिळाली. या माहितीवरून संशयित म्हणून ईश्वर गजेंद्र कांबळे (वय २१) आणि गोविंद रमेश शिंदे (वय २२, दाेघेही रा. जयनगर, रिंगराेड, लातूर) या दाेघांना माेठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. ही कामगिरी पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र केदार, पोलिस उपनिरीक्षक हाजी सय्यद, पोलिस अंमलदार मुनवरखान पठाण, दयानंद सारोळे, सुधीर साळुंखे, विनोद चलवाड, नारायण शिंदे यांच्या पथकाने केली.

खबऱ्याने दिली टीप; दाेघे अडकले जाळ्यातखबऱ्याने पथकाला टीप दिली अन् दाेघे पाेलिसांच्या जाळ्यात अलगद अडकले. त्यांची झाडाझडती घेत कसून चाैकशी केली असता, मळवटी रिंगराेड परिसरातून जाणाऱ्या कार चालकाला अडवून लुटल्याची त्यांनी कबुली दिली. तर लुटलेला माेबाइल, राेख रक्कम पाेलिसांच्या ताब्यात दिला. तपास विवेकानंद चौक ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे करीत आहेत.

यापूर्वी गंभीर ९ गुन्हे दाखल..गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेले गुन्हेगार पोलिस रेकॉर्डवर सराईत गुन्हेगार असल्याचे पाेलिसांनी सांगितले. दाेघापैकी एक ईश्वर गजेंद्र कांबळे याच्यावर लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये मालमत्ता चोरीसह इतर ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर दुसरा गोविंद रमेश शिंदे याच्यावर शस्त्र अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल आहे, असे पाेउपनि. महेश गळगटे म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर