शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवारपासून पूर्ण क्षमतेने ‘जलदूत’ जाणार

By admin | Updated: April 16, 2016 00:21 IST

मिरजेतून लातूरला पाणीपुरवठा : युध्दपातळीवर काम; दिवसआड २७ लाख लिटर पाणी देणार

शरद जाधव -- सांगली --पाणीटंचाईने व्याकूळ झालेल्या लातूरकरांच्या मदतीला धावलेल्या सांगली-मिरजकरांच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, आता लातूरला अधिक सुलभरित्या पाणी पोहोचविण्यासाठी यंत्रणा सरसावली आहे. स्वतंत्र जलवाहिनीद्वारे ‘जलदूत’ एक्स्प्रेसच्या वाघिणी भरून एकाचवेळी २७ लाख लिटर पाणी देण्याची क्षमता असलेली योजना दोन दिवसात पूर्ण होणार आहे. पाणीपुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक हैदरखान विहिरीची स्वच्छताही महापालिका प्रशासनाने सुरू केली असून, लातूरला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यासाठी एकावेळी चार यंत्रणा कामाला लागल्या आहेत. कृष्णा नदीपासून मिरजेच्या रेल्वे यार्डापर्यंतचे अंतर सात किलोमीटर आहे. त्यापैकी नदीपासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत साडेचार किलोमीटरची जलवाहिनी अस्तित्वात आहे. आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे जलशुद्धीकरण केंद्र ते रेल्वे यार्ड या उर्वरित २७०० मीटर अंतरात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यात ३०० मीटर अंतरावर लोखंडी वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी १ कोटी ८५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम शुक्रवारपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना, १२ इंच व्यासाच्या पीव्हीसी पाईप जळगाववरून उपलब्ध न झाल्याने कामात अडथळा आला होता. मात्र, आता त्या उपलब्ध झाल्याने सोमवारी दुपारपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रात्रंदिवस यंत्रणा कार्यरतलातूरला पूर्ण क्षमतेने पाणी पोहोचविण्यासाठी यंत्रणा कामाला लागली असून, या कामावर पाच जेसीबी, वेल्डिंग कामगार आणि इतर असे शंभराहून अधिक कामगार रात्रंदिवस कार्यरत आहेत. त्यांच्याबरोबर जीवन प्राधिकरण, रेल्वे व महसूल विभागाचे अधिकारी तळ ठोकून आहेत. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड हे दिवसातून दोनदा भेट देऊन स्वत: कामाची पाहणी करीत आहेत. एकाचवेळी २५ टँकर भरण्याची सोयपाणीपुरवठा अधिक सुलभ होण्यासाठी २५ अश्वशक्तीच्या दोन मोटारी बसविण्यात येणार आहेत. एकावेळी २५ टॅँकर भरण्याची सोय या नवीन यंत्रणेमुळे होणार असून ५० वाघिणींची गाडी पाठविण्याचे नियोजन प्रत्यक्षात साकार होणार आहे. या ऐतिहासिक प्रयोगाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. पाण्याच्या आणीबाणीचे गांभीर्य ओळखून यंत्रणा काम करत आहे. जलवाहिनीसाठी जळगाववरून मिरजेत सहा मीटर्सच्या ७२ पीव्हीसी पाईप आल्या आहेत. तीन ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगचे काम असल्याने विलंब लागत आहे.५० वाघिणींतून पाणी देण्याचा प्रयत्नमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून जलशुद्धीकरण केंद्रात क्रॉस कनेक्शनच्या मुख्य जोडणीचे काम पूर्ण झाले. तसेच, कोल्हापूर रेल्वे रुळाखालून जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. एकाचवेळी २५ वाघिणींमध्ये पाणी भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हैदरखान विहीर ते यार्डापर्यंत जलवाहिनीचे काम सुरू करण्यात आले असून हे संपूर्ण काम सोमवारपर्यंतपूर्ण होण्याची शक्यता आहे. लातूरला विक्रमी वेळेत पाणी पोहोचले असले तरी, ५० वाघिणींतून पाणी देण्यासाठी प्रयत्न आहे व तो येत्या दोन दिवसात पूर्णत्वास येणार आहे. लातूरला पाणी देण्यात सांगलीकरांनी दाखविलेले दातृत्व अभिमानास्पद आहे. केवळ पाच दिवसांच्या नियोजनातून लातूरला पाणी देण्यात यश आल्याने, आता पूर्ण क्षमतेने ५० वाघिणींच्या माध्यमातून पाणी देण्याचे नियोजन पूर्णत्वास येत आहे. सोमवारपर्यंत काम पूर्ण झाल्यास मंगळवारपासून लातूरला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यात कोणतीही अडचण नाही. - मकरंद देशपांडे, योजनेचे प्रणेते