शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा भरण्यास अडचण; शेतकऱ्यांनी घातला बँक अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 18:21 IST

आठ दिवसांपासून इंटरनेट बंद असल्याने शेतकरी वारंवार हेलपाटे मारत होत़ त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज सकाळी बँकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला़

ठळक मुद्देमहाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत आठ दिवसांपासून इंटरनेट बंद असल्याने शेतकरी वारंवार हेलपाटे मारत होते सोमवारपर्यंत पीकविमा न घेतल्यास बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला़

लातूर: पीकविमा भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असल्याने शेतकरी विमा भरण्यासाठी बँकेत गर्दी करीत आहेत़ परंतु, औसा तालुक्यातील बेलकुंड महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत आठ दिवसांपासून इंटरनेट बंद असल्याने शेतकरी वारंवार हेलपाटे मारत होते त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज सकाळी बँकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला़ सोमवारपर्यंत पीकविमा न घेतल्यास बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला़

प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै अंतिम मुदत आहे़ त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांची धावाधाव सुरु आहे़ औसा तालुक्यातील बेलकुंड येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा असून तिथे बेलकुंड व परिसरातील काही गावांतील शेतकरी दरवर्षी पीकविमा भरतात़ तसेच काही शेतकरी आशिव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत पीकविमा भरतात़ 

पीकविमा भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे़ बेलकुंड येथील राष्ट्रीयकृत बँकेत पीकविमा भरण्यासाठी गर्दी होत आहे़ दरम्यान, बँकेतील इंटरनेटसेवा बंद असल्याने काही शेतकरी आशिव येथील जिल्हा बँकेत पीकविमा भरण्यासाठी जात आहेत़ त्यामुळे तिथे मोठी गर्दी होत आहे़बेलकुंडच्या बँकेतील इंटरनेट सेवा व्यवस्थित चालत नसल्याने तेथील कर्मचारी अन्य ठिकाणहून पीकविमा भरण्याचा सल्ला देत आहेत़ त्यामुळे संतप्त झालेल्या जवळपास शंभर शेतकऱ्यांनी शनिवारी बँकेतील अधिकाऱ्यांना घेराव घातल सोमवारपर्यंत पीकविमा भरुन न घेतल्यास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा दिला आहे़

आठ दिवसांपासून इंटरनेट बंदबँकेतील इंटरनेट सेवा आठ दिवसांपासून बंद आहे़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत़ इंटरनेट सेवा सुरळीत होताच पीकविमा भरुन घेतला जाईल, असे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी जगन्नाथ पाटील यांनी सांगितले़

पीकविम्यापासून वंचित राहण्याची भीती़इंटरनेट सेवा बंद असल्याने संबंधितांनी याकडे लक्ष देऊन ती सुरळीत करावी़ लवकरात लवकर ही सेवा सुरळीत न झाल्यास अनेक शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहण्याची भिती आहे़ पीकविमा भरण्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचे येथील शेतकरी सूरज पाटील यांनी सांगितले़ 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीbankबँक