शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बस तिकिटांचा ट्रायमॅक्स घोटाळा प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता!

By राजकुमार जोंधळे | Updated: June 17, 2023 18:32 IST

उदगीर येथील न्यायालयाचा निकाल, पाेलिसांनी नाेंदविल्या ५० साक्षीदारांच्या साक्ष

उदगीर (जि. लातूर) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उदगीर आगारात २०१२ मध्ये झालेल्या ट्रायमॅक्स घोटाळा प्रकरणातील सर्व आरोपींची उदगीर येथील प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी जे.सी. गुप्ता यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.

उदगीर आगारात २०१२ मध्ये आरोपी अनिल मरेवाड यांनी ३ हजार ३९८ रुपयांचा अपहार केल्याची तक्रार तत्कालीन आगारप्रमुख धरणी कांडगिरे यांनी उदगीर शहर पोलिस ठाण्यात दिली होती. या प्रकरणाची अधिक चौकशी केल्यानंतर आरोपी अनिल मरेवाड यांनी ८,१४, ९७८ रुपयांचा, वाहक राहुल धनाश्री यांनी ६,९१,०१४ रुपये, नरेंद्र गौडा याने १४,६९८ रुपये, अनिल फुले यांनी ५६ हजार ४९९ रुपये, विवेक शिरूर यांनी ५०५३ रुपये, महेश पोलकर यांनी ५६,४४५ रुपयांचा अपहार तिकीट मशीनमध्ये छेडछाड करून केल्याचे उघड झाले. त्याला ट्रायमॅक्स कंपनीचे तज्ज्ञ प्रतिनिधी प्रवीण मस्के आणि अमोल मस्के यांनी मदत केली.

हिशाेबाच्या कागदावर केली हाेती खाडाखाेड...तत्कालीन राेखपाल मनोज तरोडे यांनी हिशोबाच्या कागदावर खाडाखोड करून वाहकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून शासकीय रकमेचा अपहार केल्याची तक्रार उदगीर शहर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी पुरावा म्हणून संशयित आरोपींचे मोबाइल, लॅपटॉप, आरोपींचे बँक पासबुक आदी मुद्देमाल जप्त केला हाेता. त्याचबराेबर अनेकांचे जबाबही नोंदविला हाेता.

पाेलिसांनी नाेंदविल्या ५० साक्षीदारांच्या साक्ष...या प्रकरणात पोलिसांनी जवळपास ५० जणांना साक्षीदार बनवले होते. या प्रकरणाच्या सुनावणीअंती १६ जून रोजी रोजी उदगीर येथील न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील ॲड. सचिन वैद्य यांनी, तर आरोपींच्या वतीने ॲड. शिवाजी कोकणे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर