शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून किल्लारी भूकंपातील मृतांना श्रध्दांजली

By हरी मोकाशे | Updated: September 30, 2022 15:46 IST

किल्लारीतील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाणे बंद ठेऊन काळा दिवस पाळला.

किल्लारी (जि. लातूर) : ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे झालेल्या प्रलयकारी भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांना शुक्रवारी श्रध्दांजली वाहण्यात आली. येथील स्मृतीस्तंभाजवळ पोलीस दलाच्या पथकाने हवेत बंदुकीच्या तीनदा फैरी झाडून श्रध्दांजली वाहिली. दरम्यान, शहरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेऊन काळा दिवस पाळला.

शुक्रवारी सकाळी ८.३० वा. स्मृतीस्तंभाजवळ आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., तहसीलदार भरत सूर्यवंशी, नायब तहसीलदार लाला कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर पवार, सपोनि सुनील गायकवाड, पीएसआय प्रशांत राजपूत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, सरपंच युवराज गायकवाड, औसा बाजार समितीचे उपमुख्य प्रशासक किशोर जाधव, ग्रामविकास अधिकारी तुकाराम सूर्यवंशी, बंकट पाटील आदींनी पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली अर्पण केली.

यावेळी लातूरच्या पोलीस कार्यालयातील आर.एस. डी.डी. माने यांच्या ११ पथकाने धून वाजवून व हवेत आठ रायफलीच्या तीनदा फायरिंग करुन सलामी दिली. यावेळी तलाठी हाळनूर, दत्ता पांचाळ, मंडळ अधिकारी शेख, डॉ. संजय मोरे, प्राचार्य डी.टी. कांबळे, प्रा. नंदकुमार माने, औंढे, डॉ. शंकरराव परसाळगे, दीपक पाटील, चंद्रशेखर पाटील, प्रकाश पाटील, बिसरसिंग ठाकुर, किरण बाबळसुरे, रमेश हेळंबे, वहिखाँ पठाण, प्रा. हरिश्चंद्र कांबळे, जयपाल भोसले, व्यंकट मुळजे, सतीश भोसले, देवस्थानचे अध्यक्ष अशोक गावकरे, संजय कोराळे आदी उपस्थित होते.

किल्लारीतील बाजारपेठ बंद...शहरातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाणे बंद ठेऊन काळा दिवस पाळला. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. बहुतांश घरांमध्ये श्रध्दांजली वाहण्यात येत होती. दरम्यान, आ. अभिमन्यू पवार यांनी भूकंपग्रस्तांच्या मुलभूत सुविधा सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले.

टॅग्स :laturलातूरEarthquakeभूकंप