प्रस्तावना जयप्रकाश दगडे यांनी केली. सर्वप्रथम ‘जाने वाले कभी नहीं आते, जाने वाले की याद आती है’, या गीताच्या रूपात संगमेश्वर यांना श्रद्धांजली देण्यात आली. पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी संगमेश्वर यांचे जाणे ही कल्पनाच धक्कादायक आहे, अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली. वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री अमित देशमुख यांनी मोठ्या उद्योजकांशी कै. संगमेश्वर यांची व त्यांच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीची तुलना केली. लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापौर विक्रांत गोजमगुंडे, कुलगुरू अशोक ढवण, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, लातूर अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप भाऊ राठी, माध्यम परिवाराचे रामानुज रांदड डॉ. सोमनाथ रोडे, डॉ. कल्याण बरमदे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, पत्रकार रामेश्वर बद्दर, माजी नगरसेवक मोहन माने, उद्योजक तुकाराम पाटील, डॉ. हंसराज बाहेती, डॉ. भराडिया, आनंदजी बारपुते, संतोष बिराजदार, रोटरी क्लबचे राजगोपालजी राठी, डॉ. हरिप्रसाद सोमाणी, नानिक द.जोधवानी, सुरेश पेनसलवार यांनी श्रद्धांजली वाहिली.
शोकसभेत संगमेश्वर बोमणे यांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST