ओबीसी महासंघाच्या वतीने वृक्षारोपण
लातूर : ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्या वतीने वडारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण व मासुर्डी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी महासंघाचे समन्वयक विजयकुमार पिनाटे यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी व्यंकट गरड, मच्छिंद्र राऊत, अंगद राऊत, नाना बरडे, अमोल शेळके, विजयकुमार पिनाटे, रविकांत सिरसाट, धनाजी सुगावे, सुलोचना घाटे, शिला चंदनकेरे आदींची उपस्थिती होती.
पीकविमा भरण्याचे आवाहन
लातूर : शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमा भरावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या असून, शेतातील कामे उरकली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाईन पीकविमा भरावा आणि पिकांचे संरक्षण करून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. पीकविम्याची मुदत १५ जुलै आहे. या मुदतीच्या आत पीकविमा भरावा, जेणेकरून मुदत संपण्याच्या वेळी गर्दी होणार नाही.
कोविड योद्ध्यांचा सत्कार
लातूर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या हस्ते रविवारी कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी अरविंद पाटील निलंगेकर, माजी खा. डॉ. सुनील गायकवाड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, लातूर मनपातील गटनेते ॲड. शैलेश गोजमगुंडे, राजाभाऊ मुळे, संभाजी रावणगावकर, विनोद जाधव, बापूसाहेब गोरे, सूर्यकांत शेळके, सुभाष सुलगुडले, रवी कांबळे, संतोष सोमवंशी आदींची उपस्थिती होती.