...
सरपंचांनी घेतला स्वखर्चातून बोअर
बेलकुंड : गावात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून औसा तालुक्यातील नांदुर्गा येथील सरपंच अश्विनी घाडगे यांनी स्वखर्चातून गावातील वॉर्ड क्र. १ मध्ये बोअर घेतला. त्यास मुबलक पाणी लागले आहे. वॉर्ड क्र. १ मध्ये जवळपास अडीचशे कुटुंब संख्या आहे. या ठिकाणच्या नागरिकांना पाणीटंचाई जाणवत होती. त्यामुळे १ लाख ८० हजार खर्चून पाणी प्रश्न सोडविला. यावेळी सरपंच अश्विनी घाडगे, रमा शिंदे, संगीता शिंदे आदी उपस्थित होते.
...
राष्ट्रवादीच्यावतीने विलास सिंदगीकर यांचा सत्कार
जळकोट : कवी विलास सिंदगीकर यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याने त्यांचा जळकोट तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष अर्जुन आगलावे, प्रा. चंद्रकांत मोरे, गजानन दळवे, गौतम बामणे, विलास दळवे आदी उपस्थित होते.