यावेळी तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, बीटीएमचे क्षीरसागर, कृषी सहायक अश्विनी खलसे, शेतकरी अशोक गुट्टे, परमेश्वर जोगपेटे, अनिल काळे, लक्ष्मण गुट्टे, ज्ञानेश्वर जोगपेटे, आकाश गुट्टे, नागेश गुट्टे, केशव कोंडामंगळे आदी शेतकरी उपस्थित होते. यावेळी आकाश पवार यांनी खरिपात कापूस लागवडीसाठी योग्य जमीन, शेतीची मशागत, कापूस बीज लागवड, दोन कापसांच्या रोपांतील अंतर, पिकावरील कीड नियंत्रण, गुलाबी बोंडअळी, किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी, कापूस वेचणी आदीसंदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी कृषी अधिकारी आकाश पवार म्हणाले, कापूस लागवडीत शेतकरी विविध जातींचा वापर करतात. कापसाची गुणवत्ता धाग्याच्या लांबीवरून ओळखली जाते. एकाच गावात विविध जातींचा वापर केल्यामुळे काही लांब धाग्याचा तर काही आखूड अथवा मध्यम लांब धाग्याचा कापूस येतो. त्यामुळे गुणवत्ता राखली जात नाही. परिणामी, शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही. एका गावात एकाच वाणाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो, असेही ते म्हणाले.