दिशादर्शक फलकाअभावी वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:19 AM2021-05-10T04:19:04+5:302021-05-10T04:19:04+5:30

उदगीरला पाणीपुरवठ्यासाठी लिंबोटी प्रकल्पावरून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. सध्या हे काम हडोळतीनजीक सुरू आहे. हे खाेदकाम करताना संबंधित ...

Traffic jam due to lack of directional signs | दिशादर्शक फलकाअभावी वाहतुकीची कोंडी

दिशादर्शक फलकाअभावी वाहतुकीची कोंडी

Next

उदगीरला पाणीपुरवठ्यासाठी लिंबोटी प्रकल्पावरून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. सध्या हे काम हडोळतीनजीक सुरू आहे. हे खाेदकाम करताना संबंधित गुत्तेदार व प्रशासनाने आवश्यक ती दक्षता घेणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. हडोळती हे बाजारपेठेेचे गाव असून, गावातील मुख्य बाजारपेठेतील सिमेंट काँक्रीट रस्ता जलवाहिनीसाठी फोडण्यात येत आहे. संबंधित ठेकेदाराने रस्ता पूर्वीप्रमाणे करून देण्याचे आश्वासन दिले असले तरी रस्त्याची मजबुती पुन्हा होणे अशक्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सदर खोदकामावेळी हडोळती ग्रामपंचायतीने पर्यायी तीन मार्ग सुचविले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या खोदकामामुळे रस्त्यालगतचे नाले बुजले आहेत. आगामी पावसाळ्यापूर्वी नाल्यांची दुरुस्ती न झाल्यास गावातील घरांत पाणी घुसण्याची भीती आहे. तसेच गावातून जलवाहिनी टाकली जात असल्याने खोदकामावेळी काही ठिकाणी कठीण भाग लागत आहे. अशावेळी ब्रेकरच्या सहाय्याने काम करावे लागणार आहे. परिणामी, गावातील जुन्या घरांना तडे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

त्याचबरोबर गावच्या पाणीपुरवठ्याची जलवाहिनीही याच मार्गावर आहे. या कामामुळे हडोळतीच्या जलवाहिनीचा बट्ट्याबोळ होण्याची भीती नाकारता येत नाही.

दरम्यान, गावातील काही जणांनी यासंदर्भात चौकशी केली असता सदरील कामात अडथळा निर्माण केला जात असल्याचे पत्र पोलिसांना देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे हे काम रोखण्यास कोणीही धजावत नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Traffic jam due to lack of directional signs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.