शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

वाहतुकीवर ‘ट्रॅफिक ॲम्बॅसिडर’आता करणार नागरिकांचे प्रबोधन!

By राजकुमार जोंधळे | Updated: June 3, 2023 21:18 IST

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता काय कारवाई होईल, त्याचे काय परिणाम होतील, याची जाणीव या उपक्रमाच्या माध्यमातून करून दिली जाणार आहे.

लातूर : वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आता ‘ट्रॅफिक ॲम्बॅसिडर’ पुढाकार घेणार आहेत. समाजातील विविध घटकांना, साेसायट्यांतील वाहनधारक, नागरिकांचे प्रबेधान केले जाणार आहे. यासाठी लातूर पाेलिस दलाच्या वतीने ‘ट्रॅफिक ॲम्बॅसिडर’ला कायदा, वाहतुकीच्या नियमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता काय कारवाई होईल, त्याचे काय परिणाम होतील, याची जाणीव या उपक्रमाच्या माध्यमातून करून दिली जाणार आहे. लातुरात राबविण्यात येणारा हा ‘अभिनव उपक्रम’ राज्यातील पहिलाच ठरणार आहे. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवेर यांच्या कल्पकतेतून हा उपक्रम राबविला जात आहे. 

अतिशय नावीन्यपूर्ण वाटणाऱ्या उपक्रमाला सुजाण लातूरकर नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. सध्या ऑनलाइन नोंदणीचा आकडा शंभरावर पोहोचला आहे. या ट्रॅफिक ॲम्बॅसिडरला वाहतूक शाखेच्या वतीने पांढरा टी-शर्ट आणि टोपी दिली जाणार आहे. आठवड्यातील जमेल तेवढा वेळ त्यांनी लातुरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी, वाहनधारकांचे प्रबोधन, जागृती करण्यासाठी द्यायचा आहे.

अनेकांनी नोंदवले ऑनलाइन नाव...लातूर शहर वाहतूक शाखेच्या पोर्टलवर होशी नागरिकांना आपली नावे नोंदविता येणार आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्याकडे आठवड्यात असलेला उपलब्ध वेळ नोंद करायचा आहे. त्यांना त्या-त्या वेळेत शहरातील रस्ते, चौक, सोसायट्या आणि गल्लोगल्लीतील नागरिकांत जनजागृती करायची आहे.

कायद्याबरोबरच वाहतूक नियमांचे मिळणार प्रशिक्षण...‘लातूर पोलिस पोर्टल’वर ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर त्यांना एकत्रितपणे किमान आठवडाभराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये कायद्याबराेबरच वाहतुकीच्या नियम याबाबत तज्ज्ञ पोलिस अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षित झाल्यानंतर हे ॲम्बॅसडर लातूरकरांचे, वाहनधारकांचे वाहतुकीबाबत प्रबोधन करणार आहेत.      - गणेश कदम, पोलिस निरीक्षक, लातूर

टॅग्स :laturलातूर