टिप्परची दुचाकीला धडक, एक जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:24 AM2021-02-25T04:24:34+5:302021-02-25T04:24:34+5:30

किरकोळ कारणावरून मारहाण लातूर : वडवळ नागनाथ येथे किरकोळ कारणावरून फिर्यादी लिंबराज नागनाथ साबणे व त्यांच्या मुलास मारहाण करण्यात ...

The tipper hit the bike, seriously injuring one | टिप्परची दुचाकीला धडक, एक जण गंभीर जखमी

टिप्परची दुचाकीला धडक, एक जण गंभीर जखमी

Next

किरकोळ कारणावरून मारहाण

लातूर : वडवळ नागनाथ येथे किरकोळ कारणावरून फिर्यादी लिंबराज नागनाथ साबणे व त्यांच्या मुलास मारहाण करण्यात आली. डोक्यात मारून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संगमेश्वर गंगाधर साबणे व अन्य तिघांविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जीवे मारण्याची धमकी, एकाविरुद्ध गुन्हा

लातूर : गैरकायद्याची मंडळी जमवून गोंद्री शिवारात शिवीगाळ करून तसेच मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याबाबत सतीश भानुदास मंदाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पंचनाम्यावर सही करू नका म्हणून मारहाण

लातूर : आपसात संगनमत करून फिर्यादीकडे सादर केलेला पंचनामा हा बोगस आहे. त्या पंचनाम्यावर सही करू नका म्हणून हातातील पंचनामा हिसकावून घेऊन फिर्यादीस लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उदगीर तालुक्यातील नळगीर येथे घडली. याबाबत जयकुमार मनोहर साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमेश्वर शेटे व अन्य दोघांविरुद्ध वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दुकान बंद करीत असताना पैशाची बॅग पळविली

लातूर : शटरचे दुकान नोकराला बंद होत नसल्यामुळे पैशाची बॅग गाडीवर ठेवून दुकान बंद करीत असताना अज्ञात चोरट्यांनी सदर बॅग पळविली. ही घटना १८ फेब्रुवारी रोजी घडली. याबाबत श्यामसुंदर दत्तात्रेय वट्टमवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, मार्केट यार्डातील शटरचे दुकान नोकराला बंद करता आले नाही. त्यामुळे फिर्यादी श्यामसुंदर वट्टमवार यांनी पैशाची बॅग गाडीवर ठेवून दुकान बंद केले. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी १७ हजार रुपये ठेवलेली पैशाची बॅग तसेच चेकबुक, चाव्या, दुकानाच्या नूतनीकरणाचे लायसन्स लंपास केले. रोख १७ हजार, ८ हजार ४०० रुपयाचे चेक, चाव्या व अन्य साहित्य बॅगमध्ये होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: The tipper hit the bike, seriously injuring one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.