शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लातूरात थरार! सिनेस्टाईल पाठलाग करुन गांजा पकडला; दाेघांना अटक

By राजकुमार जोंधळे | Updated: October 25, 2023 19:48 IST

लातुरातील घटना : कारसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त 

लातूर : चाेरट्या मार्गाने गांजाची वाहतूक करणाऱ्या कारचा सिनेस्टाईल पाठलाग करुन दाेघांना अटक केली. ही घटना बुधवारी लातुरात घडली. त्यांच्याकडून गांजासह कार ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दशहतवाद विराेधी शाखा, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे केली आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील नवीन  रेणापूर नाका परिसरात चाेरट्या मार्गाने गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी शाखेच्या प्रमुखांना खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे पाेलिस पथकाने बुधवारी गांजाची विक्रीसाठी वाहतूक करत असलेली कार (एम.एच. २४ एडब्ल्यू ९३४०) पाठलाग करुन पकडली. 

यावेळी कारची झडती घेतली असता, डिक्कीत ठेवण्यात आलेला बी मिश्रीत ३.२१५ किलाेग्रॅम गांजा पथकांनी जप्त केला. यावेळी शरीफ लतीफ शेख (३५, रा. कॉईल नगर, लातूर) आणि वसीम बाबूलाल अत्तार (२६, रा. धर्मापुरी ता. परळी जि. बीड) यांना अटक केली. तर ईश्वर नवनाथ फड (रा. धर्मापुरी ता. परळी) हा फरार झाला आहे. यावेळी कारसह बी-मिश्रीत गांजा, कारसह इतर साहित्य असा ९ लाख ३१ हजार ८२५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पाेलिसांच्या पथकांची संयुक्त करावाई...पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध व्यवसायावर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अवैध व्यवसायावर धाडी मारण्यात येत आहेत. अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सपोनि. प्रवीण राठोड, पोउपनि. आयुब शेख, उत्तम जाधव, अंगद कोतवाड, संपत फड, मोहन सुरवसे, नाना भोंग, सचिन धारेकर, सचिन मुंडे, नकुल पाटील, संजय काळे, चंद्रकांत केंद्रे, राहुल सोनकांबळे, सुहास जाधव, धनंजय गुट्टे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी