शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चोरीकरून निघाले देवदर्शनाला, लातूर पोलिसांच्या नाकाबंदीत तीन दरोडेखोर अडकले

By राजकुमार जोंधळे | Updated: August 16, 2022 20:27 IST

ट्रॅव्हल्सने तिरुपतीला निघाले होते, न्यायालयाने सुनावली चार दिवसांची पोलीस कोठडी

लातूर : एमआयडीसी परिसरातील एका वेअर हाऊसवर दरोडा टाकून १४० कट्टे सोयाबीन पळविणाऱ्या टोळीतील तिघांना ट्रॅव्हल्स भाड्याने करून तिरुपतीला देव दर्शनासाठी जाताना लातुरात नाकाबंदी करुन पकडण्यात आले आहे. तिघांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील एकूण आठ आरोपीपैकी पाच जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी सांगितले, लातूरतील एमआयडीसी परिसरात असलेले एक वेअर हाऊस एक महिन्यापूर्वी तर- ढोकी परिसरात वास्तव्याला असलेल्या अट्टल आरोपीनी फोडले होते. दरम्यान, वेअर हाऊसमध्ये ठेवण्यात आलेले १४० कट्टे सोयाबीन  पळविले होते. याबाबत लातूरतील एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकूण आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील पाच जणांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य तिघेजण पोलिसांना चकवा देत जागा बदलत फिरत होते. उस्मानाबाद येथील एक ट्रॅव्हल्स भाड्याने करून ते तिरुपतीला देवदर्शनासाठी जात असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. 

नाकाबंदीत अडकली ट्रॅव्हल्स...

दरम्यान, पोलिसांनी ढोकी, मुरुड आणि लातुरात बार्शी रोडवर नाकाबंदी केली. यावेळी येणाऱ्या प्रत्येक वाहनांची झाडाझडती घेतली. अखेर बार्शी मार्गावरून ट्रॅव्हल्सला रोखत ती ठाण्यात आणण्यात आली. यातील अनिल बाप्पा काळे, आकाश उर्फ तोब्या मधू पवार आणि राहुल तानाजी पवार (सर्व रा. पळसप ता. जि. उस्मानाबाद) यांना अटक करण्यात आली. त्यांना लातूरच्या न्यायालयात मंगळवारी हजर केले असता, न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप कराड करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूरRobberyचोरी