शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विवाह समारंभ आटोपून परतताना कारचा भीषण अपघात, मामासह तीन भाचे ठार

By हरी मोकाशे | Updated: March 27, 2023 17:32 IST

चलबुर्गा पाटीजवळील घटना : दोघे गंभीर जखमी

निलंगा/ औसा/ किल्लारी (जि. लातूर) : मामाचा विवाह समारंभ आटोपून गावाकडे परतताना भरधाव वेगातील कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने औसा- निलंगा मार्गावरील चलबुर्गा पाटीजवळ सोमवारी सकाळी ७ वाजता भीषण अपघात झाला. यात मामासह तीन भाचे जागीच ठार झाले तर चौघे जखमी झाले. त्यातील दोघे गंभीर आहेत.

अंश किरण बडूरकर (१०), जय सचिन बडूरकर (१०), अमर सचिन बडूरकर (१५, सर्वजण रा. दत्तनगर, निलंगा), प्रकाश लक्ष्मण कांबळे (२७, रा. हालसी तुगाव, ता. निलंगा) असे मयत झालेल्या चौघांची नावे आहेत.

निलंगा तालुक्यातील हलसी तुगाव येथील आकाश लक्ष्मण कांबळे यांचा विवाह रविवारी पुण्यातील मुळशी येथे होता. त्यासाठी निलंग्यातील बडूरकर कुटुंबिय गेले होते. विवाह समारंभ पार पडल्यानंतर सचिन डिगंबर बडूरकर, गोदावरी सचिन बडूरकर, जान्हवी सचिन बडूरकर, यश किरण बडूरकर, अमर सचिन बडूरकर, जय सचिन बडूरकर, अंश किरण बडूरकर आणि प्रकाश लक्ष्मण कांबळे (रा. हालसी तुगाव) हे कार (एमएच २४, एएफ ७०५०) ने सोलापूर- औसा मार्गे निलंग्याकडे परतत होते. ही कार सोमवारी सकाळी ७ वा.च्या सुमारास चलबुर्गा पाटीजवळ पोहोचली असता अचानकपणे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार पुलाच्या बाजूस असलेल्या खोल खड्ड्यात जावून उलटली.

या भीषण अपघातात अंश बडूरकर, जय बडूरकर, अमर बडूरकर आणि मामा प्रकाश कांबळे हे जागीच ठार झाले. या अपघातात गोदावरी बडूरकर, जान्हवी बडूरकर ह्या गंभीर जखमी असून त्यांच्यावर लातुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सचिन बडूरकर, यश बडूरकर हे जखमी झाले आहेत.

कार पुलाच्या नजिकच्या खड्ड्यात कोसळली...भरधाव वेगातील कार चालकाचा ताबा सुटल्याने ही कार औसा- निलंगा मार्गावरील चलबुर्गा पाटीजवळील पुलाच्या बाजूस असलेल्या १५ ते २० फुट खोल असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटली. यात कारचा चक्काचूर झाला आहे.

मृतात तीन भावंडांचा समावेश...

या अपघातात दोन सख्ख्या व एका चुलत भावाचा आणि मामाचा मृत्यू झाला आहे. आई- वडिलांसह एक भाऊ व बहिण जखमी झाली आहे.अपघातस्थळी किंचाळ्याच किंचाळ्या...सकाळच्या वेळी या मार्गावर शांतता असते. मात्र, हा अपघात घडल्याने जोरदार किंचाळ्या आणि रडण्याबरोबरच वाचवा वाचवा असा आवाज येत होता. हे ऐकून या मार्गावरुन ये- जा करणाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली. कारमधील सर्वांना वाहनाबाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे औश्यातील रुग्णालयात पाठविले. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक नाना लिंगे, आबा इंगळे, जमादार आर. बी. साळुंके, सचिन उस्तुर्गे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मदत केली.

बडूरकर- कांबळे कुटुंबावर शोककळा...

विवाह सोहळ्याच्या आनंदात बडुरकर कुटुंबिय गावाकडे परतत होते. तेव्हा हा अपघात घडला. त्यामुळे काही क्षणातच दु:खाचा डोंगर निर्माण झाला. या घटनेमुळे बडूरकर, कांबळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. औश्याच्या ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश पाहून हृदय हेलावत होते.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर