शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जेवळीत भांडण सोडविणा-या वृद्धाचा खून, आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 20:35 IST

तालुक्यातील जेवळी येथे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका वृद्धाचा कु-हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली.

लातूर : तालुक्यातील जेवळी येथे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका वृद्धाचा कु-हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींना अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. जेवळी येथे जनार्दन बाळासाहेब रणदिवे हा आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. घरामध्ये पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडण होत होते. दरम्यान, हे भांडण तू का पाहतो असे म्हणून जनार्दन रणदिवे यांनी चंद्रकांत कांबळे याला विचारणा केली. त्यावेळी कांबळे आणि त्याच्या कुटुंबातील अन्य काही जण जनार्दनला याबाबत जाब विचारण्यासाठी आले. आपल्या मुलाचे शेजा-यासोबत सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी बाळासाहेब शेषेराव रणदिवे हे धावले असता चंद्रकांत नवनाथ कांबळे याने त्यांच्या डोक्यात कु-हाडीचे घाव घातले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अशोक माळी यांनी दिली.याबाबत जनार्दन रणदिवे यांच्या फिर्यादीवरून चंद्रकांत कांबळे, सुनील गुलाब कांबळे, नितीन राजेंद्र कांबळे, मिलिंद कांबळे या चौघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम ३०२, ५०४, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चारही आरोपींना सोमवारी रात्री अटक केली असून, त्यांना लातूरच्या न्यायालयात मंगळवारी हजर केले असता न्यायालयाने २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनास्थळी शहर उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत ढवळे यांनी भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :jailतुरुंग