शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चाेरीच्या गुन्ह्यातील तीन सराईत आराेपींना अटक

By राजकुमार जोंधळे | Updated: October 9, 2023 19:21 IST

लातूर येथील स्थागुशाच्या पथकाची कारवाई...

लातूर : चाेरीच्या गुन्ह्यातील तिघा सराईत आराेपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दाेन दुचाकी, एक पाणबुडी माेटार आणि तीन माेबाइल असा मुद्देमाल जप्त केला आहे. चाैकशीत तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे पथक लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी चाेरट्यांचा माग काढत हाेते. दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पथकाला खबऱ्याने माहिती दिली. लातुरातील शास्त्रीनगरात कमी पैशात मोबाइल विक्री करण्याच्या प्रयत्न करत आहेत. या माहितीवरून पथकाने तिघांना एका दुचाकीसह ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून दाेन दुचाकी, एक पाणबुडी माेटार आणि तीन माेबाइल असा मुद्देमाल जप्त केला आहे.

पादचाऱ्यांना मारहाण करून पळविले माेबाइल...परमेश्वर निवृत्ती बोयणे (२०, रा.शास्त्रीनगर, लातूर), विशाल चंद्रकांत गुळवे (१९, रा.इकबाल चौक, लातूर) आणि बाबा आजम पठाण (१९, रा.शास्त्रीनगर, लातूर) असे ताब्यात घेतलेल्या आराेपींनी नावे सांगितली. त्यांच्याकडे मोबाइलबाबत चाैकशी केली असता, रात्रीच्या वेळी पाचनंबर ते औसा रोड जाणाऱ्या मार्गावर पायी जाणाऱ्या व्यक्तींना मारहाण करून, जबरदस्तीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचे तीन मोबाइल, एक पाणबुडी मोटार, एक दुचाकी, गुन्हा करताना वापरलेली एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

माेबाइल चाेरीमध्ये दाेन महिलांना अटक...आणखीन एका कारवाईत स्थागुशाच्या पथकाने मोबाइल चोरीत दोन महिलांना ताब्यात घेत, चोरी केलेला मोबाइल जप्त केला आहे. त्यांच्याविराेधात शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दखल केला आहे. ही कारवाई स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सहायक फौजदार संजू भोसले, अंमलदार रामहरी भोसले, योगेश गायकवाड, सुधीर कोळसूरे, सिद्धेश्वर जाधव, राजेश कंचे, राहुल सोनकांबळे, मनोज खोसे, नितीन कठारे, प्रदीप चोपणे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर