शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

  व्यसनमुक्तीसाठी धावले हजारो लातूरकर..! जिल्हा पोलिस दलाचा उपक्रम  

By राजकुमार जोंधळे | Updated: December 3, 2023 18:37 IST

भल्या पहाटे गुलाबी थंडीत लातूरकरांनी व्यसनाधीनतेच्या जनजागृतीसाठी धाव घेतली.

लातूर: भल्या पहाटे गुलाबी थंडीत लातूरकरांनी व्यसनाधीनतेच्या जनजागृतीसाठी धाव घेतली. जिल्हा पोलिस दलाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘एक धाव व्यसनमुक्तीसाठी’या मॅरेथॉन स्पर्धेत विविध गटांत लातूरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला प्रतिसाद दिला. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे व अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या संकल्पनेतून ही मॅरेथॉन रविवारी सकाळी क्रीडा संकुलातून विविध गटांत पार पडली. तरुणांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेचे प्रमाण थांबविण्यासाठी व यासंदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने ही मॅरेथॉन झाली. त्यात ६ हजार ३५८ धावकांनी धाव घेतली. स्पर्धेत लातूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. दहा किलोमीटरच्या स्पर्धेला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली. त्यानंतर पाच किलोमीटर व तीन किलोमीटर प्रकारातील स्पर्धकांना धावण्यासाठी सोडण्यात आले.

व्यसनमुक्तीच्या फलकाने जागृतीमॅरेथॉन दरम्यान स्पर्धेच्या मार्गावर विविध शाळांतील शेकडो मुलांनी स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. यासोबतच व्यसनमुक्तीचे फलक घेऊन जनजागृतीचे कार्यही केले. विविध ठिकाणी असलेल्या संगीत ग्रुपनेही स्पर्धकांचे मनोरंजन केले. जिल्हा पोलिस दलाच्या वतीने उत्तम व्यवस्थापन झाल्याने स्पर्धकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. खेळाडूंसह विविध सायकलिस्ट ग्रुप, मॉर्निंग वॉकिंग ग्रुप, दिव्यांग ग्रुप तसेच सामाजिक संस्थांनीही यात सहभाग नोंदविला.

वॉर्मिंग अपसाठी झुंबा ठरला विशेष पहाटे ५ वाजताच स्पर्धकांनी क्रीडा संकुलात प्रवेश केला. प्रथमत: धावपटूंच्या वॉर्मिंग अपसाठी झुंबा डान्सचे आयोजन करण्यात आले होते. संगीताच्या तालावर झुंबा डान्स करत धावपटूंचा मात्र चांगलाच वॉर्मअप झाला. त्यानंतर प्रत्यक्षात मॅरेथॉनला सुरुवात झाली. या झुंबा डान्समध्ये जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्यासह जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक अजय देवरे, सीईओ अनमोल सागर यांनीही ठेका धरला होता.

विविध वयोगटांतील स्पर्धकांचा समावेशया मॅरेथॉन स्पर्धेत लातूरकरांनी हिरीरिने सहभाग नोंदविला होता. विशेषत: पुरुष व महिलांसह विविध वयोगटांतील स्पर्धकांनी आपले धावण्याचे कौशल्य पणाला लावले होते. काही स्पर्धकांनी तर गेल्या अनेक दिवसांपासून या मॅरेथॉनची तयारी केली होती. त्यामुळे या मॅरेथॉनला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :laturलातूरMarathonमॅरेथॉन