शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या लग्नकार्यासाठी घरात ठेवलेल्या पैशावर डल्ला मारणाऱ्या चाेरट्यांना अटक

By राजकुमार जोंधळे | Updated: June 10, 2025 21:37 IST

गांधी चाैक पाेलिस ठाण्याच्या पथकाची कारवाई

- राजकुमार जाेंधळे

लातूर : शहरातील लाड गल्लीत मुलीच्या लग्नकार्यासाठी घरात ठेवलेल्या पैशावर डल्ला मारणाऱ्या दाेघा चाेरट्यांना अवघ्या १२ तासांच्या आत रोख रकमेसह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गांधी चौक पाेलिस ठाण्याच्या पथकाने साेमवारी केली आहे.

पाेलिसांनी सांगितले, रविवारी गांधी चौक ठाण्याच्या हद्दीत लाड गल्लीत एका घराचा कडीकोयंडा तोडून चाेरट्यांनी आत प्रवेश केला. दरम्यान, घरातील लोखंडी पेटीचे कुलूप तोडून मुलीच्या लग्नकार्यासाठी ठेवलेली रोख २ लाख ८० हजारांची राेकड अज्ञात चाेरट्यांनी पळविली. याबाबत गांधी चौक पाेलिस ठाण्यात गुरनं. २४१/२०२५ कलम ३३१(१), ३०५ (अ) बीएनएसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी गुन्ह्यातील आराेपींच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले हाेते. अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, लातूरचे डीवायएसपी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चाैक ठाण्याचे पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सतीश हुकूमचंद लाड (वय ५०) आणि संतोष विजयकुमार चापोलीकर (वय ४५, दाेघेही रा. लाड गल्ली, लातूर) यांना ताब्यात घेतले. कसून चाैकशी करत त्यांच्याकडून चाेरलेली २ लाख ८० हजारांची राेकड आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली दुचाकी असा एकूण ३ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे, पोलिस उपनिरीक्षक अक्रम मोमीन, पाेलिस अंमलदार राजेंद्र टेकाळे, प्रकाश भोसले, राम गवारे, शिवाजी पाटील, संतोष गिरी यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी