शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मिरवणुकीत धक्का लागला; चाकूने भाेसकून युवकाचा खून

By राजकुमार जोंधळे | Updated: February 3, 2023 19:43 IST

ही घटना ताजोद्दीन बाबा दर्गा रोड लातूर येथील एका एका जीमसमोर गुरुवारी रात्री घडली.

लातूर : संदल मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणावरून एका युवकाचा चाकूने भाेसकून खून केल्याची घटना लातुरात गुरुवारी रात्री उशिरा घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आराेपीला अटक करण्यात आली आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरात गुरुवारी रात्री संदल मिरवणूक निघाली हाेती. दरम्यान, या मिरवणुकीत तरुण नाचत हाेते. यावेळी धक्का लागल्याच्या कारणावरून फैजान आरिफ कुरेशी (वय १८, रा. भाेई गल्ली, दयानंद राेड, लातूर) याच्यामध्ये आणि जैद जावेद सय्यद (रा. बाैद्धनगर, लातूर) या दाेघांमध्ये शिवीगाळ, बाचाबाची झाली. या वादातूनच जैद सय्यद याने फैजान आरिफ कुरेशी याच्या पाेटात चाकू खुपसून खून केला. ही घटना ताजोद्दीन बाबा दर्गा रोड लातूर येथील एका एका जीमसमोर गुरुवारी रात्री घडली.

घटनास्थळी अपर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, लातूर शहर उपविभागीय पाेलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनेनंतर घटनास्थळी तातडीने पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, शुक्रवारी सकाळी मयत फैजल आरिफ कुरेशी याचा दफनविधी करण्यात आला. यावेळी तगडा पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. याबाबत मयत युवकाचा भाऊ रेहान आरिफ कुरेशी (वय २०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जैद जावेद सय्यद याच्याविराेधात गु.र.नं. ८२/२०२३ कलम ३०२, ५०४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आराेपी जैद जाहेद सय्यद याला पाेलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. तपास सहायक पाेलिस निरीक्षक बी.बी. खंदारे करत आहेत.

क्षुल्लक कारणावरून घडली घटना...लातूर शहरात गुरुवारी रात्री ताजोद्दीन बाबा दर्गा रोडवरून संदल काढण्यात आला हाेता. दरम्यान, या संदल मिरवणुकीत माेठ्या प्रमाणावर तरुणांचा सहभाग हाेता. यावेळी नाचताना, गर्दीमुळे जैद जाहेद सय्यद याला फैजल आरिफ कुरेशी याचा धक्का लागला. याच क्षुल्लक कारणावरून दाेघांमध्ये बाचाबाची झाली आणि आराेपी जैद जाहेद सय्यद याने फैजलच्या पाेटात अचानकपणे चाकू खुपसत खून केला. या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली. खुनाच्या इतर कारणांचा शाेध पाेलीस घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर