देवणी तालुक्यातील वलांडी येथे लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या ग्रीन वलांडी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन व १० लाखांच्या सिमेंट रस्ता आणि नूतन अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच राणीताई भंडारे होत्या. यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत, अंगणवाडी पर्यवेक्षिका गुरव, माजी सरपंच रामभाऊ भंडारे, ग्रामविकास अधिकारी हनुमंत केंद्रे, पांडुरंग येलमेटे, विस्ताराधिकारी येडले, उपसरपंच मोहम्मद सौदागर, नागेश बदनाळे, धनराज बिरादार, सुनील चिल्लरगे, शिवाजी जगताप, रवी स्वामी, मुस्ताक कादरी, महेश बंग, रवी गायकवाड, अमन पठाण, संगमेश्वर स्वामी आदींची उपस्थिती होती.
वलांडी ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक जागेवर आतापर्यंत पहिल्या टप्प्यात १२०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी नागरिकांनी एक लाखापेक्षा अधिक लोकवाटा दिला आहे.
बाला उपक्रमांतर्गत वलांडी केंद्रीय जिल्हा परिषद शाळेस ग्रामस्थ, माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शैक्षणिक साहित्याबरोबर शाळेच्या भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. यावेळी रामभाऊ भंडारे, सोमनाथ स्वामी, संजीव कटके यांनी प्रत्येकी एक एलईडी संच शाळेला भेट दिले.