झुम, गुगल मीट हे ॲप डाऊनलोड केले आहेत. त्यावर लिंक आल्यानंतर वर्ग सुरू होतात; मात्र कधी कधी आवाज येत नाही. तर कधी नेट कनेक्टिव्हिटी मिळत नाही. त्यामुळे अडचण होते. त्यातच वर्गाची वेळ संपते. - वैभव गायकवाड, विद्यार्थी
झूमवर वर्ग घेतला जातो. माझ्या मोबाईलचे नेट गेल्या ३० दिवसांपासून संपले आहे. त्यामुळे वर्ग बंद आहेत. रिचार्ज केल्यानंतर क्लास जॉईन करणार आहे. दर महिन्याला दोन-तीन दिवस रिचार्ज संपल्यामुळे वर्ग बुडत आहे. - गोवर्धन ससाणे, विद्यार्थी
कोविडमुळे ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. ऑफलाईन वर्गासारखे विद्यार्थ्यांकडे लक्ष देता येत नसले तरी हा चांगला पर्याय आपल्याला आहे. याकडे सकारात्मक दृष्टीने पहायला हवे. वर्ग बंद राहण्यापेक्षा मुलांसोबत कनेक्टिव्हिटी आहे. -
गेल्या दीड वर्षांपासून ऑनलाईन वर्ग घेतले जातात. सगळेच विद्यार्थी वर्गाला जॉईन होत नसले तरी ५० टक्क्यांच्या पुढे विद्यार्थी दररोज वर्ग करतात. यामुळे विद्यार्थ्यांसोबत संवाद होतो. होम वर्कची थोडी समस्या आहे. परंतु, ज्ञानदान होते. -
बहुतांश शाळांमध्ये झूम, गुगल मीट या ॲपद्वारे वर्ग घेतले जातात. काही मोठ्या शाळांमध्ये स्वत:ची संगणकीय प्रणाली आहे. त्याद्वारे वर्ग चालतात. कोविड काळातही ज्ञानदानाचे कार्य न थांबता तंत्रज्ञानावर सुरू आहे. आता शाळाही सुरू होण्याच्या हालचाली शासनस्तरावर आहेत. - विशाल दशवंत, शिक्षणाधिकारी प्राथमिक