शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पो पाठीमागे घेताना महिला चिरडली; संतप्त गावकऱ्यांनी रोखला रस्ता

By हरी मोकाशे | Updated: December 16, 2022 17:29 IST

लातूर- अंबाजोगाई महामार्गावरील कोळगाव तांड्याजवळ टेम्पो पाठीमागे घेताना एका महिलेचा चिरडून जागीच मृत्यू झाला.

लातूर :

लातूर- अंबाजोगाई महामार्गावरील कोळगाव तांड्याजवळ टेम्पो पाठीमागे घेताना एका महिलेचा चिरडून जागीच मृत्यू झाला. त्यामुळे तांड्यावरील संतप्त नागरिकांनी महामार्ग अर्धातास रोखून धरला होता. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वा. च्या सुमारास घडली.

शांताबाई रतन राठोड (५५, रा. कोळगाव तांडा, ता. रेणापूर) असे मयत महिलेचे नाव आहे. लातूर- अंबाजोगाई महामार्गावरील कोळगाव तांड्याकडे शांताबाई रतन राठोड ही महिला शुक्रवारी दुपारी डोक्यावर गवताचा भारा घेऊन येत होती. तेव्हा तेव्हा लातूरहून अंबाजोगाईकडे टेम्पो (एमएच १६, क्यू २२९६) हा जात होता. दरम्यान, याच मार्गावर पलिकडील बाजूस वाहतूक पोलीस अधिक प्रमाणात मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत होते. पोलिसांनी या टेम्पोस थांबविले. तेव्हा चालकाने पुढे गेलेला टेम्पो मागे घेत असताना सदरील महिलेस पाठीमागून धक्का बसला. त्यामुळे ती पडली आणि काही क्षणातच तिच्या अंगावरुन टेम्पो गेल्याने चिरडली.

या घटनेची माहिती मिळताच कोळगाव तांड्यावरील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान, रेणापूर ठाण्याचे पोनि. दीपक शिंदे, कर्मचारी बाळासाहेब कन्हेरे, गौतम कांबळे आदी घटनास्थळी दाखल झाले. ज्यांच्यामुळे ही घडली, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करीत कोळगाव तांड्यावरील नागरिकांनी अर्धा तास महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होते. सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.

वाहतूक पोलिसांमुळे अपघात झाल्याचा आरोप...महामार्गावर वाहन तपासणी व कारवाईसाठी वाहतूक पोलीस होते. त्यांनी टेम्पोस थांबविले. त्यामुळे चालकाने टेम्पो पाठीमागे घेताना ही घटना घडली. वाहतूक पोलिसांमुळे ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी करुन कारवाई करावी म्हणून रस्तारोको केला.

दोषींवर कठोर कारवाई...अपघाचा संपूर्ण घटनाक्रम तपासून दोषींवर कारवाई केली जाईल, असे सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी ग्रामस्थांना सांगितले. वाहतूक पोलिसांची व्हॅन व ते कर्मचारी सध्या रेणापूर ठाण्यात आहेत, असे सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात