शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काळ आला होता पण...ट्रक-कारच्या भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी, सुदैवाने ६ जण बचावले

By हरी मोकाशे | Updated: December 29, 2023 18:00 IST

ट्रकने पत्र्याच्या शेडला पूर्णपणे बेचिराख केले

निलंगा : लातूर - जहिराबाद महामार्गावरील गौरपाटीजवळ ट्रक व कारची समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही अपघाताची घटना गुरूवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसला. अपघातातील जखमींत आ. संभाजी पाटील- निलंगेकर यांचे स्वीय सहायक व भाजपा शहराध्यक्षांचा समावेश आहे.

लातूर - जहिराबाद महामार्गावरील गौरपाटी (ता. निलंगा) येथे लातूरकडे जाणारा ट्रक क्रमांक (एमएच २४, जे ६४४६) व लातूरहून निघालेली कार क्रमांक (एमएच २४, एडब्ल्यू ६७२५) या दोन वाहनांची गुरूवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात माजी मंत्री आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांचे स्वीय सहायक अरविंद चव्हाण व निलंगा भाजपाचे शहराध्यक्ष तम्मा माडीबोणे हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, तरुणांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी लातूरला हलविले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात झाल्यानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या गोविंद शिंदे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसला. यावेळी सुदैवाने सहा जण बचावले.

काळ आला होता पण...गौर येथील रोहित शिंदे व व्यंकट शिंदे हे दोघे भाऊ आपल्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये प्रदीप तावडे, शुभम चव्हाण, एकनाथ देशपांडे, जयहरी बोरुळे या मित्रांना घेऊन जेवणासाठी बसले होते. तेवढ्यात मोठा आवाज झाला. रस्त्यावरील गाडीचे टायर फुटले असावे, असा अंदाज बांधला. मात्र, क्षणार्धात ट्रक या पत्र्याच्या शेडमध्ये घुसला. तेव्हा आम्ही कसे बाहेर पडलो, हे आम्हालाही काही क्षण कळाले नाही. आम्ही असलेले सहाजण सुखरूप आहोत हे आम्हालाच काही वेळ कळत नव्हते. कारण ट्रकने पत्र्याच्या शेडला पूर्णपणे बेचिराख केले होते. आम्ही कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून उपचारासाठी लातूरला पाठविले. आम्हावर काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असे त्यांनी सांगितले.

दोन लाखाच्या लॅपटॉपचा चुराडा...जेवणापूर्वी मी लॅपटॉपवरून कंपनीचे ऑनलाइन काम करत होतो. परंतु, आम्ही बसलेल्या ठिकाणी ट्रक घुसल्याने लॅपटॉपचा चुराडा झाला. त्यात दोन लाखाचे नुकसान झाले, असे प्रदीप तावडे यांनी सांगितले. दरम्यान, अपघातानंतर कार ५० ६० फुट दूर गेली होती.

टॅग्स :laturलातूरTrafficवाहतूक कोंडीAccidentअपघात