शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकऱ्यांचा ‘सुप्रीम’ आधार कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली, जिल्हाधिकारीपदी सचिन ओम्बासे

By आशपाक पठाण | Updated: September 30, 2022 12:28 IST

उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे, तर लातूरचे मनपा आयुक्त अमन मित्तल जळगावचे जिल्हाधिकारी

लातूर : वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे हे उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत. यासंदर्भातचे आदेश राज्य शासनाने गुरुवारी रात्री उशिरा काढले. जिल्हाधिकारी ओम्बासे हे २०१५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

दरम्यान, उस्मानाबादचे विद्यमान जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण विकास प्रकल्पाच्या संचालकपदावर बदली झाली आहे. लातूर महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांची जळगाव जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे, तर जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची नांदेड येथे बदली झाली आहे.

कृषी, ग्रामविकासात पथदर्शी काम, दिवेगावकर प्रकल्प संचालकपदीजिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या विमा कंपन्यांच्या यंत्रणेतील त्रुटी शोधल्या. त्यांच्या संवेदनशील भूमिकेमुळे कंपनीविरुद्ध अनेक दावे उभे राहिले. आता कंपन्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार कोट्यवधींची नुकसानभरपाई द्यावी लागेल. तुळजाभवानी देवीचे पारंपरिक मंकावती कुंडासारख्या प्रकरणात अवैध हस्तांतरण रोखले, अतिक्रमणे काढली, अनेकांवर गुन्हेही दाखल केले. जिल्ह्यातील इनामी जमिनीचे गैरव्यवहार शोधून काढून २,७०० हेक्टर्सपेक्षा अधिक जमिनींची प्रकरणे निकाली निघाली. कोविड काळात ते कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर शासकीय रुग्णालयातच उपचार घेत सरकारी यंत्रणेवरील जनतेचा विश्वास वाढविला. शेतकऱ्यांना ‘सुप्रीम’ आधार, तुळजापूरच्या ऐतिहासिक, आध्यात्मिक वारशाचे जतन अन् अतिवृष्टी, कोविडसारख्या नैसर्गिक संकटात पालकत्वाची भूमिका बजावणे ही कामे उस्मानाबादकरांसाठी शीर्षस्थानी राहतील.

टॅग्स :laturलातूरOsmanabadउस्मानाबाद