शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या क्रीडा संकुलात घुमणार कबड्डीचा आवाज; मैदान उपलब्ध झाल्याने खेळाडूत आनंद

By राजकुमार जोंधळे | Updated: July 18, 2023 19:07 IST

कबड्डी दिनाचे औचित्य साधून लोकमतने 'क्रीडा संकुलात दबतोय कबड्डीचा आवाज' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.

- महेश पाळणेलातूर : मराठमोळ्या असलेल्या देशी खेळ कबड्डीला क्रीडा संकुलात अडचणींमुळे जागा नव्हती. त्यामुळे कबड्डी खेळाचा आवाज दबला होता. याबाबत लोकमतने राष्ट्रीय कबड्डी दिनी वृत्त प्रकाशित करून विषय ऐरणीवर आणला होता. याची क्रीडा विभागाने दखल घेत क्रीडा संकुलात कबड्डी खेळासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे आता शहरातील क्रीडा संकुलात कबड्डी... कबड्डी... असा आवाज घुमणार आहे. 

कबड्डी दिनाचे औचित्य साधून लोकमतने 'क्रीडा संकुलात दबतोय कबड्डीचा आवाज' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. यावर क्रीडा विभागानेही प्रतिसाद देत क्रीडा संकुलातील मुख्य मैदानाशेजारी असलेल्या ४०० मीटर धावन पथाजवळ कबड्डी खेळासाठी एक मैदान उपलब्ध करून दिले आहे. कबड्डी दिनापासून सरावाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. क्रीडा विभागालाही स्पर्धेसाठी बॅडमिंटन हॉलचा आधार घ्यावा लागत होता. मात्र, आता मैदान उपलब्ध करून दिल्याने खेळाडूंना दैनंदिन सरावाला वाव मिळणार आहे.

सातत्य राहणे गरजेचे...क्रीडा विभागाने कबड्डी खेळासाठी मैदान उपलब्ध करून दिले असले तरी जिल्हा संघटना व माजी खेळाडूंना सरावासाठी वेळ देणे गरजेचे आहे. जेणेकरून दैनंदिन कबड्डीचा सराव संकुलात दिसेल. मार्गदर्शक लक्ष्मण बेल्लाळे, ज्ञानोबा लहाने, लालबा कावळे, सतीश लोभे यांनी क्रीडा संकुलात कबड्डीच्या सरावाला सुरुवात केली आहे. अधिकाधिक खेळाडू कसे सहभागी होतील व त्यासाठीचे सातत्य राहणेही गरजेचे आहे.

ग्रामीण भागाप्रमाणे शहरातही मिळावा वाव...जिल्ह्यातील ग्रामीण भागात कबड्डीचा आवाज मोठ्या प्रमाणात घुमतो. तेथील मैदानेही खेळाडूंनी भरलेली असतात. विशेषत: रेणापूर, काटगाव, भीसेवाघोली, अहमदपूर, नागलगाव व उदगीर येथे कबड्डीचे खेळाडू मोठ्या प्रमाणात आहेत. हीच संस्कृती शहरातही चालली तर भावी कबड्डीपटू पुढे येतील.

टॅग्स :laturलातूरKabaddiकबड्डी