शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेने ४५ लाखांची थकबाकी भरली नाही; निलंगा पाणीपुरवठा योजनेला टाळे !

By संदीप शिंदे | Updated: March 29, 2024 18:47 IST

नोटिसा देऊनही थकबाकी भरली नाही; निम्न तेरणा धरण, जलाशय उपसा सिंचन विभागाची कारवाई

निलंगा : निम्न तेरणा धरण व जलाशय उपसा सिंचन प्रकल्प माकणी या विभागांनी निलंगा पालिकेकडे ४५ लाख रुपये थकबाकी असल्याने पाणीपुरवठा उपसा करणाऱ्या ठिकाणी टाळे ठोकले आहे. त्यामुळे मागील पाच दिवसापासून निलंगा शहराचा पाणीपुरवठा बंद असून, शहरात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, होळीच्या सणाला पाणीटंचाईचा सामना निलंगा शहरातील नागरिकांना करावा लागत आहे.

निलंगा शहराला माकणी धरणातून ४० किलोमीटर पाईपलाईन अंथरून माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी पाणीपुरवठा सुरू केला. त्यानंतर पंचवीस वर्षांनी माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी या पाईपलाईनचे नूतनीकरण केले व पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न केला. मात्र या पाणीपुरवठा पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात दोष असून नेहमीच पाणीपुरवठा यंत्रणा विस्कळीत होते. कधी लाईट बिल न भरल्यामुळे तर कधी तांत्रिक बिघाडामुळे बंद असते. आता तर चक्क लोअर तेरणा विभागाने ४५ लाख पाणीपट्टी थकीत असल्यामुळे माकणी येथील पाणीपुरवठा यंत्रणेलाच टाळे ठोकले. त्यामुळे कर्मचाऱ्यांची पळापळ चालू झाली व नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी व माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी माकणी धरण येथे जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली. सध्या रमजान व होळीच्या सण असल्यामुळे पाणीपुरवठा चालू करू द्या अशी विनंती केली. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी ४५ लाखापैकी ५० टक्के रक्कम भरली तरच पाणीपुरवठा चालू होईल अन्यथा नाही अशी भूमिका घेतल्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणा अडचणीत आली आहे.

तीन दिवस सुट्टी असल्याने पालिकेसमोर पेच...शुक्रवार, शनिवार, रविवार असे तीन दिवस कार्यालयीन सुट्टी असल्यामुळे एवढ्या पैशाची जुळवाजुळव करायची कशी हा पेच पालिका यंत्रणेसमोर आहे. धरणात पाणी आहे, पाणीपुरवठा योजना नवीन कार्यान्वित केलेली आहे. मात्र केवळ नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे कधी लाईट बिल थकीत, तर कधी तांत्रिक दोष, तर कधी पाणीपट्टीमुळे या कृत्रिम टंचाईमुळे निलंगा शहरवासियांना ऐन उन्हाळ्यात तसेच होळीच्या सणानिमित्त पाण्यासाठी घागरी घेऊन वन-वन फिरावे लागत असल्याचे चित्र आहे.

नोटिसा देऊनही थकबाकी भरली नाही...निम्न तेरणा धरण व जलाशय उपसा सिंचन शाखा माकणीचे अभियंता कृष्णा येणगे म्हणाले, ४५ लाख रुपये निलंगा नगरपालिकेकडे थकबाकी आहे. यापूर्वी त्यांना दहा ते पंधरा वेळेस नोटीसा देऊनही ते बाकी भरायला तयार नाहीत. त्यामुळे शेवटी हा निर्णय वरिष्ठांच्या सांगण्यावरून घेण्यात आला आहे. थकीत बिलाचा भरणा करावा अशा सुचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार यंत्रणा बंद करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी