शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पित्यासाेबत वाढदिवसाचा केक घेवून जाणाऱ्या मुलीला चिरडले! 

By राजकुमार जोंधळे | Updated: February 10, 2024 21:51 IST

लातुरातील बारा नंबर पाटी रेल्वे गेटनीजक अपघात...

राजकुमार जाेंधळे / लातूर : वाढदिवस असल्याने आपल्या पित्यासाेबत केक घेवून घराकडे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव दुचाकीने जाेराची धडक दिली. या अपघातात पाठीमागे केक घेवून बसलेली मुलगी अन्नू (वय १३) राेडवर फेकली गेली. दरम्यान, ती ट्रॅक्टरच्या ट्राॅलीखाली आल्याने जागीच ठार झाली. हा अपघात बारानंबर पाटी रेल्वे गेटनजीक घडला. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, जवानाराम मंगळराम जाट (वय ४६ मु. हानुद्वारा पाे. साेनाहिया ता. फुलाेरा जि. जयपूर, राजस्थान) हे लातुरातील सीआरपीएफ कॅम्पमध्ये पाेलिस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. ते आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन (एम.एच. २४ ए.सी. ९६४४) मुलीला घेवून लातूर शहरात केक आणण्यासाठी आले हाेते. ते केक घेवून घराकडे निघाले असता, बारानंबर पाटी रेल्वेगेटनजीक समाेरुन आलेल्या भरधाव दुचाकीने (एम.एच. २४ बी.क्यू. २३५९) त्यांच्या दुचाकीला जाराेची धडक दिली. यावेळी पाठीमागे बसलेली मुलगी रस्त्यावर फेकली गेली. ती ट्रॅक्टरच्या ट्राॅलीखाली (एम.एच. २४ बी.एल. २१७७) आल्याने जागीच ठार झाली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दुचाकी चालक वसीम उस्मान शेख (वय २३ रा. भाेईसमुद्रगा ता. जि. लातूर) याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

वाढदिवसादिवशीच अन्नूला मृत्यूने गाठले...

अन्नूचा वाढदिवस असल्याने पिता जवानाराम जाट हे आपल्या मुलीला घेवून केक आणण्यासाठी दुचाकीवरुन लातुरात आले हाेते. दरम्यान, केक घेवून ते परत घराकडे जाताना सीआरपीएफ कॅम्पनजीक दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात अन्नूला वाढदिवसादिवशीच मृत्यू गाठले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने मात्र अनेकांच्या मनला चटका लावला आहे.

पाच मिनिटांच्या अंतरावरच हाेते घर...

वाढदिवस असल्याने पित्यासाेबत दुचाकीवर हातात केकचा बाॅक्स घेवून पाठीमागे बसलेल्या अन्नूचा समाेरुन आलेल्या भरधाव दुचाकीने घात केला. अचनाकपणे जाेराने धडक दिल्याने बेसावध असलेली अन्नू रस्त्यावर फेकली गेली. डाव्या बाजून जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्राॅली आल्याने ती ठार झाली. अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर घर हाेते, मात्र काळाने तिच्यावर असा घाला घतला.

टॅग्स :Accidentअपघात