शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आईला सतत होणारी मारझोड पहावली नाही, वडिलाचा मुलानेच चाकूने भोसकून केला खून

By राजकुमार जोंधळे | Updated: June 5, 2023 13:49 IST

जन्मदात्या वडिलांचा चाकूने भोसकून खून केल्यानंतर आरोपी मुलगा हा घटनास्थळावरून पसार झाला होता.

लातूर : आईला मारहाण करणाऱ्या वडिलाचा पोटच्याच मुलाने चाकूने भोसकून, सपासप वार करुन खून केल्याची खळबळजनक घटना लातुरातील रेणुका नगरात शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनतंर पसार झालेल्या मुलास पोलिसांनी आज पहाटे अटक केली आहे. 

पोलिसांनी सांगितले, लातुरातील आंबेजोगाई रोडवरील आंबा हनुमान मंदिराच्या पाठीमागे रेणुका नगरात जानकर यांच्या घरी भाड्याने क्षीरसागर कुटुंब राहत होते. दरम्यान, फिर्यादी मंगल क्षीरसागर (वय ४३) यांना पती सोमनाथ मधुकर क्षीरसागर (वय ४५) हा सतत मारझोड करत होता. शनिवारी त्याने पत्नीला मारहाण सुरु केली. यावेळी तेवीस वर्षीय मुलगा रोहित हा घरातच होता. आईला होत असलेली मारहाण पाहून त्याला राग आला. डोळ्यासमोर होणारी मारहाण सहन झाली नाही. रागाच्या भरात घरात असलेला चालू रोहितने हाती घेतला आणि जन्मदात्यावर सपासप वार केले. चाकूने भोसकून त्याने वडिलांचा खून केला. घटनास्थळावरून तो पसार झाला. यावेळी जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळलेल्या पतीला पत्नी मंगल यांनी तातडीने लातुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी जखमी झालेल्या सोमनाथ यांना मृत घोषित केले. घटनास्थळी लातूर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे, पोलिस निरीक्षक गोरख दिवे, पोलिस उपनिरीक्षक अतुल डाके, पोलिस उपनिरीक्षक संदीप कराड यांनी भेट देऊन पंचनामा केला. 

याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात मंगल सोमनाथ क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुलगा रोहित सोमनाथ क्षीरसागर याच्याविरोधात गुरनं. ४०२ / २०२३ कलम ३०२ भादंवि प्रमाणे रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक कराड करत आहेत. 

सोमवारी पहाटे मुलाला अटक...जन्मदात्या वडिलांचा चाकूने भोसकून खून केल्यानंतर आरोपी मुलगा रोहित हा घटनास्थळावरून पसार झाला होता. दरम्यान, पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेत त्याला सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी