शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर उतरताना ऑटारिक्षाला भरधाव कारने उडविले; चार प्रवासी गंभीर जखमी

By राजकुमार जोंधळे | Updated: June 2, 2023 15:54 IST

लातूर-नांदेड महामार्गावर अपघात; या अपघातात ऑटोरिक्षातील चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत

लातूर : महामार्गालगत थांबविण्यात आलेल्या ऑटाेला भरधाव कारने उडविल्याने चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघातलातूर शहरालगतच्या महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत कृषी महाविद्यालयासमोर लातूर - नांदेड महामार्गावर शुक्रवारी दुपारी झाला. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरानजीक नांदेड महामार्गावर असलेल्या कृषी महाविद्यालयासमाेर ऑटाे चालकाने महामार्गालगत थांबविला हाेता. दरम्यान, ऑटाेमध्ये प्रवाशांची (एमएच २४ एटी २६९८) चढ-उतार करत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने (एमएच ०५ एनएस १८२७) ऑटाेला उडविले. या अपघातात ऑटाे रस्त्यालगतच्या खड्ड्यात काेसळला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

जखमीमध्ये दीपक हरिभाऊ राठोड (रा. फरदपूर, ता. रेणापूर), तेजस्विनी राजाराम फुंदे (रा. वांगदरी, ता. रेणापूर), उज्ज्वला श्रीराम राठोड (रा. गंगाखेड, जि. परभणी) आणि ऑटोचालक प्रथमेश शिवाजी कांबळे हे गंभीर जखमी झाल्याची माहिती विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्याचे पाेलिस हेड काॅन्स्टेबल पांडुरंग काेकणे यांनी दिली. घटनास्थळी पाेलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वळणावर रस्त्यावर झाला भीषण अपघात...ऑटोचालक प्रथमेश कांबळे हा लातूर शहराकडून कोळपा गावाकडे प्रवाशांची वाहतूक करत हाेता. दरम्यान, ऑटाेतील दोन प्रवासी कृषी महाविद्यालयासमोर महामार्ग लेनच्या बाहेर ऑटो उभा करून उतरवत हाेता. उस्मानाबादकडून नांदेडच्या दिशेने निघालेल्या कारने ऑटाेला पाठीमागून जाेराने उडविले. दरम्यान, लातूर - नांदेड महामार्गावरील वळण रस्त्यावर हा अपघात झाला. यात ऑटाेसह कारचे माेठे नुकसान झाले.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर