शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

रस्त्यावरील खड्ड्यांचे पूजन करून लांबोटा येथील युवकांचे थाळीनाद आंदोलन

By संदीप शिंदे | Updated: June 28, 2024 17:22 IST

गावभरातून पाइपलाइनसाठी संपूर्ण गावातून खोदलेला रस्ता व होणाऱ्या गैरसोयीकडे लक्ष वेधून घेतले.

निलंगा : विविध विकासकामे व अत्यावश्यक सेवा मिळाव्या, या मागणीसाठी लांबोटा येथील युवकांनी थाळीनाद आंदोलन करून ग्रामपंचायतीला जागे करण्यासाठी शुक्रवारी आंदोलन केले.

निलंगा शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या लांबोटा गावात गैरसोय असून मुख्य रस्त्यापासून लांबोटा गावात येणारा एक किलोमीटर अंतराचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. यावरील खड्ड्याचे आंदोलनकर्त्यांनी पूजन केले. गावभरातून पाइपलाइनसाठी संपूर्ण गावातून खोदलेला रस्ता व होणाऱ्या गैरसोयीकडे लक्ष वेधून घेतले. गावात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. त्यावर फिल्टर बसवावे. नळ कनेक्शनसाठी विनाकारण अकराशे रुपये अनामत रक्कम म्हणून घेतले जात आहेत. ते घेऊ नये. गावातील अवैध दारूवर बंदी करावी. गावातील नाल्या पूर्ण बुजल्या आहेत. त्या खुल्या कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. सरपंच हजर नसल्याने उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक कार्यालयाकडे फिरकतच नाहीत, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. दोन महिन्यांपूर्वी सिमेंट रस्ता करण्यात आला. मात्र, सिमेंट रस्ताच पाच फूट जमिनीत रुतला व पूर्णत: खराब झाला असून, याची त्वरित चौकशी करावी व संबंधित गुत्तेदाराचा परवाना जप्त करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

सरपंच गैरहजर; दुसऱ्याकडे पदभार द्यावा...गावाला कायमस्वरूपी सरपंच नेमावा किंबहुना सरपंच कायम गैरहजर असल्यामुळे इतर सदस्यांची सरपंच म्हणून निवड करावी व गावाचा कारभार सुरळीत करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात प्रसाद देशमुख, उमेश पाटील, विष्णू मुंजाळ, ज्ञानेश्वर दुपटणे, शमियोउद्दीन शेख, जहरुद्दीन शेख, ओम पाटील, चंद्रकांत बिराजदार, अजित काळे, संदीप आवटे आदींसह युवकांचा सहभाग होता. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयास देण्यात आले.

टॅग्स :laturलातूरagitationआंदोलन