शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी शिक्षक दिनी शिक्षकांचे आंदोलन, जिल्हा परिषदेवर धडकली शिक्षकांची रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 19:32 IST

शहरातील गांधी चौक येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय शिक्षक परिषदेसह अन्य संघटनांच्या वतीने शिक्षक दिनी रॅली काढण्यात आली.

लातूर : शहरातील गांधी चौक येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय शिक्षक परिषदेसह अन्य संघटनांच्या वतीने शिक्षक दिनी रॅली काढण्यात आली. यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शासन निर्णयानुसार मान्यताप्राप्त अनुदानित शाळेतील अतिरिक्त अथवा नैसर्गिक वाढीच्या वर्ग, तुकड्यांना प्रचलित नियमाप्रमाणे तातडीने अनुदान मंजूर करावे, यासह अन्य मागण्यांसाठी शिक्षक परिषदेच्या वतीने बुधवारी सकाळी आंदोलन करण्यात आले.यानिमित्त गांधी चौकातील शिक्षण उपसंचालक कार्यालय ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत शिक्षकांनी रॅली काढली. रॅली दरम्यान शिक्षकांनी भीक मांगो आंदोलन करून आपले निवेदन प्रशासनाला सादर केले. १६ आॅगस्ट २०१२ च्या शासन निर्णयाप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०१२-१३ मध्ये देण्यात आलेल्या, १४ मार्च २०११, ३ सप्टेंबर २०१३, ८ आॅक्टोबर २०१३, ७ फेब्रुवारी २०१४ च्या शासन निर्णयानुसार मंजूर मात्र जून २०१२ पासून कार्यरत असलेल्या मान्यताप्राप्त अनुदानित शाळेतील अतिरिक्त अथवा नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना प्रचलित नियमानुसार अनुदान मंजूर करावे, या तुकड्यांना चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर मूल्यांकन करणे क्रमप्राप्त होते. पण ते करण्यात आले नाही. ते करावे. प्रचलित नियमाप्रमाणे पाचव्या वर्षी २० टक्के, सहाव्या वर्षी ४० टक्के आणि नवव्या वर्षी १०० टक्के अनुदान देणे क्रमप्राप्त होते. मात्र ते शासनाकडून अद्यापही देण्यात आले नाही.या तुकड्यांना नियमाप्रमाणे अनुदान द्यावे, यासह अन्य मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे शामराव लवांडे, विभागीय अध्यक्ष धनंजय उजनकर, शिवकुमार अंबुलगे, ज्ञानेश्वर जाधव, शिवशंकर स्वामी, अशोक नाटकरे, विश्वनाथ खंदाडे, संदीप बिराजदार, विकास भिंगोले, फैय्याज जळकोटे, लक्ष्मण डोंगरे, संतोष साळुंके, दयानंद बानापुरे, दत्तात्रय माने, किशोर गाढवे, गौरव सिंदफळकर, बापूराव रोंगे, ज्ञानेश्वर गजरे, सचिन चव्हाण, कृष्णा हुमनाबादे, फरहाना शेख, शिल्पा मुस्के, अरुणा कांदे, निखिल घोडके, ज्योती गुंजोटे, राघवेंद्र बोरोळे आदींसह जिल्ह्यातील शिक्षकांची उपस्थिती होती.निलंग्यात काळ्या फिती लावून आंदोलन...निलंगा येथे शिक्षक समिती तसेच शिक्षक सहकार संघटनेने विविध मागण्यांसाठी काळ्या फिती लावून आंदोलन केले. डीसीपीएस योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. प्रशासनाच्या विरोधात काळ्या फिती लावून शिक्षकांनी निषेध नोंदविला. यावेळी शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, शिक्षक समिती तालुकाध्यक्ष अरुण साळुंके, संजय कदम, बालाजी येळीकर, गणेश गायकवाड, तानाजी सूर्यवंशी, सहदेव माने, सुनील टोंपे, भास्कर सोळुंके, संजय सूर्यवंशी, चंद्रकांत गेंटेवाड, विष्णू धुमाळ, सुरेश जाधव, कृष्णा पेंटेवाड, माऊली मारकवाड, आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :laturलातूर