शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सातपूते, खलूरे, जगदाळे यांना शिक्षक गुणगौरव पुरस्कार

By संदीप शिंदे | Updated: September 1, 2023 23:36 IST

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष योगदानाबद्दल होणार सन्मान

लातूर : विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांमध्ये नवोपक्रम राबविण्याबरोबरच समाजात वृक्षारोपण, अवयवदान, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विशेष जनजागृती केल्याबद्दल राज्य शासनाच्या वतीने जिल्ह्यातील डॉ. सतीश सातपुते, महादेव खळूरे, प्रा. डॉ. संदीपान जगदाळे यांना राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार शुक्रवारी जाहीर झाला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये लातूरातील शासकीय वसाहतीतील जिल्हा कन्या प्रशालेतील सहशिक्षक डॉ. सतीश नारायणराव सातपुते यांचा समावेश आहे. त्यांनी नवोपक्रम स्पर्धेत सतत पाच वर्षे सहभागी होऊन राज्यस्तरावर पुरस्कार मिळविला. तसेच दीक्षा ॲप्लिकेशन निर्मिती करुन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविला.

कोविड काळात शाळा बंद मात्र, शिक्षण सुुरु निर्मितीत सहभाग घेत शैक्षणिक कार्य केले. शिवाय, सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो.अहमदपूरच्या यशवंत विद्यालयातील महादेव खळूरे यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव अंतर्गत विशेष कला शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी शासकीय ग्रेड परीक्षा मुल्यमापन केंद्रात पाच वर्षे परीक्षक म्हणून कार्य केले. स्वीप कलापथकाद्वारे मतदार जनजागृती केली. तंबाखुमुक्त शाळा अभियानात तसेच इंधन बचत व उर्जा संवर्धनात उत्कृष्ट कार्य केले. तसेच ज्येष्ठ कलावंत कमिटी व एकल कलावंत समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे.

लातुरातील दयानंद कला महाविद्यालयातील प्रा.डॉ. संदीपान जगदाळे हे संगीत विषयाचे शिक्षक आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे पाच विद्यार्थ्यांची नावे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. १९ पुस्तकांचे त्यांनी लेखन केले असून, ॲपच्या माध्यमातून मोफत व आनंददायी शिक्षण ते देत आहेत. गौंड आदिवासी वस्तीवर जाऊन त्यांनी तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. या त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कार दिला जाणार आहे.

टॅग्स :laturलातूरTeacherशिक्षक