...
बाभळगावच्या समतल पाझर तलावाची पाहणी
लातूर : तालुक्यातील बाभळगाव, सलगरा बु., दगडवाडी येथे सुरु असलेल्या पाझर तलाव व जलसंधारण कामाला शनिवारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गाेयल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख, जिल्हा परिषद सदस्य सुभाष जाधव, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता शिवलिंग थडकर, कार्यकारी अभियंता खोडे, शाखा अभियंता मुरुमकर, उपअभियंता अनिल कांबळे, नायब तहसीलदार राजेश जाधव, सरंपच प्रिया मस्के, उपसरपंच गोविंद देशमुख, आदी उपस्थित होते.
...
किल्लारीत दिव्यांगांना रेशन किटचे वाटप
किल्लारी : येथील राणी लक्ष्मीबाई सामाजिक संस्था व किल्लारी पोलीस ठाण्याचे एपीआय सुनील गायकवाड यांनी दिव्यांगांना रेशन किटसह सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले. राणी लक्ष्मीबाई गटाच्या अध्यक्ष ज्योतीताई हालकुडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. २० दिव्यांगांना किटचे वाटप झाले. यावेळी एपीआय गायकवाड यांनी नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. यावेळी भाजपचे सुशीलकुमार वाजपेयी, तलाठी विकास बुबणे, ग्रामसेवक बिराजदार, सतीश भाेसले, आदी उपस्थित होते.
...
पाणीपुरवठा सुरळीत, नागरिकांची भटकंती थांबली
औराद शहाजानी : कोरोनाच्या संकट काळात हलगरा येथे नियमित पाणीपुरवठा करण्यात आल्याने नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे. हलगऱ्याच्या सरपंच मंगलताई पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी कोरोना काळात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, म्हणून चौकात सार्वजनिक नळ उभा करुन परिसरातील नागरिकांना पाणी थेट दारापर्यंत उपलब्ध करुन दिले आहे. यासाठी सरपंच मंगलताई पाटील, उपसरपंच अमृत बसवदे, सदस्य शिवाजी गुदळे आदींनी परिश्रम घेतले.