महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
लातूर : स्वारातीम विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील पदव्युत्तर इतिहास विभागातील स्वरसंगीता जाधव व वर्षा माकणे या विद्यार्थिनींनी यश मिळविले आहे. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, डॉ. सदाशिव दंदे, डॉ. ओमशिवा लिगाडे, डॉ. किरण ओटले, डॉ. शाहुराज यादव, प्रा. कुंदन लोखंडे आदींसह प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.
बुद्धिबळ स्पर्धेत विजयकुमार उपासे यांचे यश
लातूर : शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयाचे विजयकुमार उपासे यांनी यश मिळविले आहे. या यशाबद्दल भीमाशंकर देवणीकर, विजयकुमार मठपती, सिद्धेश्वरअप्पा हलकुडे, सिद्धय्या स्वामी, डॉ. अशोक सांगवीकर, अनुप देवणीकर, प्राचार्य डॉ. संजय थोंटे, डॉ. विजयेंद्र स्वामी आदींसह प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.
इस्कॉनच्या वतीने बक्षीस वितरण
लातूर : इस्काॅन लातूर शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या मूल्य शिक्षण संवर्धन परीक्षेची बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ५ वी ते ७ वी व ८ वी ते १० वी अशा दोन गटांत ही स्पर्धा पार पडली. वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. मोहन डोईबळे, इस्कॉनचे बलदेव प्रभू, मालिनी माताजी यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. यशस्वितांमध्ये युगंधर गरड, अस्मिता ठाकूर, सोहम कापसे, ओमकेश्वर सिंग, ईशिता सोनी, वैष्णवी सोनवणे, अवनी प्रयाग, प्रसाद शिंदे, संदेश कांबळे, निसर्गा शेट्टी यांचा समावेश आहे.
बीसेफची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
लातूर : बहुजन समाज कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दत्ता माने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उपाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, अण्णासाहेब नरसिंग, महासचिव प्रा. रामराव वाघमारे यांची तर कार्यकारिणीत शांतीलाल चव्हाण, तानाजी सुरवसे, किशोर शिंदे, उत्तम गवळी, प्रशांत कांबळे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल एम.के. शिंदे, व्यंकट दंतराव, प्रा.डॉ. बुद्धाजी गाडेकर, बालाजी जोगदंड, गोविंद गारकर, ॲड. अंगद गायकवाड, रतन कांबळे, जयराम वाघमारे, उमाकांत सूर्यवंशी, बालाजी शिंदे, परमेश्वर कांबळे उपस्थित होते.
अनिल पुजारी यांची कोषाध्यक्षपदी निवड
लातूर : भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा कोषाध्यक्षपदी अनिल पुजारी यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, अरविंद पाटील निलंगेकर, अजितसिंह पाटील कव्हेकर, शैलेश लाहोटी, स्वातीताई जाधव, दीपक मठपती, शैलेश गोजमगुंडे, ॲड. गणेश गोमचाळे, दत्ता चेवले, ॲड. ज्ञानेश्वर चेवले आदींसह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
बार्शी रोडवरील पथदिवे सुरू करावेत
लातूर : एमआयडीसी परिसरातील ५ नंबर चौक ते महिला तंत्रनिकेतन या मुख्य रस्त्यावरील काही पथदिवे बंद आहेत. पथदिवे बसविण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासूनची आहे. या रस्त्यावर वर्दळ असल्याने पथदिवे गरजेचे आहेत. शहर महापालिकेने याकडे लक्ष देत बंद असलेले पथदिवे तात्काळ सुरू करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.