पुणे मार्गावर गर्दी
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मध्यम आणि लांब पल्ल्याच्या बसफेऱ्यांना सध्या प्रवाशांचा अल्प प्रतिसाद आहे. मात्र पुणे मार्गावर प्रवाशांची गर्दी आहे. खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत महामंडळाची रातराणीची बससेवा सध्या तोट्यात आहे. तर दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्स खचाखच भरून धावत आहेत.
ट्रॅव्हल्सचे तिकीट अधिक; तरीही गर्दी
अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ट्रॅव्हल्स आणि बसफेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. एसटीला दिवसा प्रवाशांचा प्रतिसाद आहे. मात्र रात्री तो दिसून येत नाही.
खासगी ट्रॅव्हल्सने नेहमी रात्रीला प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. आता मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीसारखी प्रवासी संख्या दिसून येत आहे.
ट्रॅव्हल्सच्या तुलनेत महामंडळाची प्रवासी संख्या सध्या दिसून येत नाही. ट्रॅव्हल्स मात्र सध्या खचाखच भरून धावत आहेत. तर रातराणी रिकामी धावत आहे.
लांब पल्ल्याच्या मार्गावर एसटीच्या फेऱ्या वाढविण्याचे नियोजन महामंडळाचे आहे. मात्र प्रवासी संख्या अल्प असल्याने ती वाढविणे शक्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून लातूर विभागाने जिल्हाअंतर्गत व जिल्हाबाहेरील प्रवासी सेवा सुरू केली आहे. सध्या नागपूर-कोल्हापूर आणि पुणे मार्गावर दहा बसेस दररोज रवाना होत आहेत. अपेक्षित भारमान नसले तरी प्रवाशांची सोय म्हणून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. हैदराबाद आणि औरंगाबाद या मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली नाही.
- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक