चाकूर : मळणी यंत्राने केलेल्या राशीच्या पैशावरुन फिर्यादीसह भावाला मारहाण करण्यात आल्याची घटना कवठाळी येथे रविवारी घडली. याबाबत चाकूर पाेलीस ठाण्यात तिघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी शिवशंकर ज्ञानाेबा डाेंबाळे (२८, रा. कवठाळी, ता. चाकूर) यांच्या भावाला गावातीलच निवृत्ती राम डाेंबाळे याच्यासह अन्य दाेघांनी संगनमत करुन मळणी यंत्रावर रास केलेले पैसे का देत नाहीस, असे म्हणून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तर आराेपी क्रमांक २ याने फिर्यादीच्या डाेक्यात कुऱ्हाडीच्या दांड्याने मारुन जखमी केले. ही घटना कवठाळी येथे रविवारी घडली. यावेळी कुऱ्हाडीने पाय ताेडताे, अशी धमकीही देण्यात आली.
याप्रकरणी चाकूर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन निवृत्ती डाेंबाळे याच्यासह अन्य दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस नाईक थाेरमाेटे करत आहेत.