शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांना झटका; 'एमपीडीए' अंतर्गत सराईत गुंडावर स्थानबद्धतेची कारवाई, वर्षभर जेलची हवा

By राजकुमार जोंधळे | Updated: August 11, 2023 18:08 IST

लातूर जिल्ह्यात सराईत गुंडाला वर्षभर जेलची हवा !

 

लातूर : जिल्ह्यातील कासारशिरसी (ता. निलंगा) पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका सराईत गुंडाला वर्षभरासाठी 'एमपीडीए' कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आले आहे. कुख्यात गुंडाविरुद्ध करण्यात आलेली ही तिसरी कारवाई आहे. डीगंबर उर्फ दिगंबर विठ्ठल दगदाडे (वय २५) असे कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. 

लातूर जिल्ह्यातील गुंडगिरी, भाईगिरीला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सुरु केलेल्या मोहिमेमधील ही तिसरी कारवाई असून, सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंडाचा स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात, सराईत गुंड, भाईगिरी करणारे, अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची माहिती संकलित करून, त्यांचे रेकॉर्ड तयार करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार कासारशिरशी ठाण्यामार्फत महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एमपीडीए) कायद्यांतर्गंत डीगंबर उर्फ दिगंबर विठ्ठल दगदाडे याला 'एमपीडीए' कायद्याखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध करुन त्याची दिनांक लातूर जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे. 

जिल्ह्यातील विविध ठाण्यातगंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल...

कुख्यात गुंड डीगंबर उर्फ दिगंबर विठ्ठल दगदाडे याच्याविरुद्ध लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यासह कासारशिरशी ठाण्यात गंभीर स्वरूपाचे पाच गुन्ह्यांची नोंद आहे.  त्यात जीवे मारण्याचा प्रयत्न, मालमत्तेचे नुकसान, गंभीर दुखापत करणे, दहशत निर्माण करुन मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ करणे, बेकायदेशीर जमाव गोळा करुन दहशत करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र वापरणे, अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

काय आहे 'एमपीडीए'कायदा आणि तरतूद..?

महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडिओ, पायरसी) वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे गुन्हेगार यांच्या विघातक कृतींना प्रतिबंध करण्याविषयीचा कायदा सन १९८१ (सुधारणा  १९९६, २००९ व २०१५) अंतर्गत स्थानबद्धतेचा आदेश म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिविटी) होय. सराईत गुन्हेगार किंवा सातत्याने सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणार्‍या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी