शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी ३५३९ पशुधनाचे वंधत्व निवारण

By हरी मोकाशे | Updated: December 7, 2023 18:57 IST

लातूर जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय पशुधनाची एकूण संख्या ५ लाख १३ हजार आहे.

लातूर : दूध उत्पादन वाढविण्यासाठी तसेच भाकड जनावरांची संख्या कमी करण्यासाठी राज्यात वंधत्व निवारण अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २६० गावांत शिबीरे घेण्यात आली. त्यात ३ हजार ५३९ पशुधनांवर वंधत्व निवारणाचे उपचार करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय पशुधनाची एकूण संख्या ५ लाख १३ हजार आहे. त्यात प्रजननक्षम पशुधनाची संख्या २ लाख ४१ हजार ४८ अशी आहे. दरम्यान, सन २०२१- २२ मधील आकडेवारीनुसार दररोजची प्रति व्यक्तीसाठीची राज्यातील दूध उपलब्धता ही ३१५ ग्रॅम आहे. राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत राज्यातील प्रति दिन प्रति व्यक्ती दुधाची उपलब्धता ही १२९ ग्रॅमने कमी आहे. तसेच भाकड जनावरांची संख्याही अधिक आहे. दुधाळ जनावरे भाकड राहण्याचे प्रमुख कारणे म्हणजे त्यांच्यातील वंध्यत्व होय. राज्यातील दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी गायी- म्हशींची प्रजनन क्षमता वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने २० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान राबविण्यात येत आहे.

अभियानाअंतर्गत तपासणी, उपचारराज्यव्यापी वंधत्व निवारण अभियानअंतर्गत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक पशुधन तपासणी व उपचार शिबिर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत २६० गावांमध्ये शिबीर घेण्यात आले आहेत. त्यात ३ हजार ५३९ भाकड जनावरांची तपासणी करण्यात येऊन वंधत्व निवारणाचे उपचार करण्यात आले आहेत. उर्वरित गावांत येत्या १९ डिसेंबरपर्यंत शिबीर घेण्यात येणार आहेत.

अडीच लाख जनावरे प्रजननक्षमजिल्ह्यात गाय आणि म्हैसवर्गीय पशुधन संख्या ५ लाख १३ हजार असली तरी सध्या त्यातील २ लाख ४१ हजार ४८ जनावरे प्रजननक्षम आहेत. सध्याचा कालावधी हा पशुधन गाभण राहण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे शिबिरादरम्यान, भाकड जनावरांची तपासणी करुन तात्काळ उपचार करण्यात येत आहेत. त्यासाठी अभियानपूर्वी गावोगावी बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली आहे.

२१ दिवसानंतर पुन्हा तपासणी...शिबिरादरम्यान पशुधनावर वंधत्व निवारणाचे उपचार करण्यात येत आहेत. त्यानंतर पुन्हा २१ दिवसांनी या जनावरांची तपासणी करण्यात येणार आहे. तेव्हा सदरील पशुधन गाभण राहिले की नाही, हे पाहून आणखीन उपचार केले जाणार आहेत. जिल्ह्यात दूध उत्पादन वाढविण्यासाठी आणि भाकड जनावरांची संख्या कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे.- डॉ. श्रीधर शिंदे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी