जिल्हा नेटबॉल निवड चाचणी स्पर्धा
लातूर : नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी लातूर जिल्ह्याच्या संघाची निवड उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात व अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात सकाळी ९ वाजता होणार आहे. यात १९ वर्षांखालील मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे. या निवड चाचणी स्पर्धेत खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष भरत चामले, सचिव शिवानंद मठपती, विशाल शेळके यांनी केले आहे.
निबंध स्पर्धेचा ऑनलाइन सन्मानपत्र वितरण सोहळा
लातूर : राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जन्मोत्सवानिमित्त ॲक्टिव्ह सह्याद्री संघटन समूहाच्या वतीने ऑनलाइन भाषण व निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यावेळी ऑनलाइन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनंजय पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून रामप्रसाद डोईफोडे, प्राचार्य सलिमा सय्यद, ज्ञानेश्वर डोंगरे हे होते.
क्रीडासंकुलात पार्किंगला हवी शिस्त
लातूर : जिल्हा क्रीडासंकुलात सकाळ-सायंकाळच्या सत्रांत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र, यावेळी असलेल्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे खेळाडू, नागरिकांचे हाल होत आहेत. प्रवेशद्वारासमोरच वाहनांची रांग असल्याने खेळाडू व नागरिकांना प्रवेश करताना अडचणी होत आहेत. सुरक्षारक्षक तैनात असतानासुद्धा पार्किंगला शिस्त नसल्याने खेळाडूंसह नागरिकांतून रोष व्यक्त होत आहे. पार्किंगला शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे.
पद्मानगरातील पथदिवे बंद
लातूर : बार्शी रोडवरील पद्मानगर भागातील अंतर्गत रस्त्यातील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. परिणामी, या भागात रात्रीच्या वेळी अंधार पसरला आहे. यासह नालेसफाईतून काढण्यात आलेली घाणही गेल्या अनेक दिवसांपासून उचलली गेली नाही. त्यामुळे परिसराची स्वच्छता करून अंतर्गत रस्त्यावरील पथदिवे पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सोलर पॅनलच्या प्लेटची चोरी
लातूर : निलंगा तालुक्यातील दापका शिवारातील सर्व्हे नं. ६६/१ मध्ये कृषीपंप वापरासाठी बसविलेल्या सोलर पॅनलपैकी एक सोलर पॅनलप्लेट चोरीला गेल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी फिर्यादी देविदास ग्यानोबा भोपी (रा. दापका, ता. निलंगा) यांच्या तक्रारीवरून निलंगा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे नमूद आहे.
साडी फॅशन शोमध्ये महिलांचा सहभाग
लातूर : इनोव्हेटिव्ह डिजिटल मार्केट महिला समूहाच्या वतीने साडी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यावेळी रूपा शिरसीकर, प्रीती मिसर, मधुरा चंद्रात्रे, वर्षा नागदे, स्मिता थोरकर, शोभा जाधव, वर्षा कुलकर्णी, स्वाती घोरपडे, आम्रपाली देशमुख, अंकिता पाटील, हेमलता कनकंदडे, स्मिता पाटील, सविता ब्याळे, अश्विनी देशमुख, ऐश्वर्या पिंपळे, रूपाली पाटील, नेहा मुक्कावार, राजश्री बनसोडे, प्रीती यादव, सुरभी कुलकर्णी, अमृता शिंदे, दीपाली सूर्यवंशी, सुचिता सूर्यवंशी, सुनीता पाटील आदींची उपस्थिती होती.
धनेगाव येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
लातूर : तालुक्यातील धनेगाव येथे आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण हणमंतराव पाटील यांच्या हस्ते पोलिओ डोस देऊन लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी डॉ. रूपाली गंगाबोयणे, सी.के. वाघमारे, एस.एस. हाळे, ए.पी. तांदळे, एम.पी. गायकवाड, एस.एस. जाधव, एस.व्ही. शेख, एस.ए. मेकले, के.डी. मेकले, मैनोद्दीन शेख आदींसह सदस्यांची उपस्थिती होती.
किसान कामगार समन्वय समितीचे आंदोलन
लातूर : केंद्र सरकारने तीन शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याअनुषंगाने किसान कामगार समन्वय समिती लातूरच्या वतीने शनिवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत नांदेड रोड, औसा रोड, अंबाजोगाई रोड, बार्शी रोड आदी ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांसह शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात अभियान
लातूर : येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. एस.डी. कंकणवाडी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, वाहन निरीक्षक सचिन बंग, एस.जी. बंकवाड, प्रा. बालाजी जाधव, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, डॉ. संजय गवई, ऋषिकेश ढगे, कृष्णा ठाकूर, तहसिन मणियार, अनिल देशमाने, लक्ष्मीकांत देशमुख, वर्षा रसाळ, अर्जुन बंडगर, जलील सय्यद, बालाजी डावकरे, ओम ढमाले, संतोष राठोड, अनिकेत पाटील, नवनाथ गवळे उपस्थित होते.
सीए इन्स्टिट्यूटच्या वतीने अभ्यास दौरा
लातूर : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या लातूर व नांदेड शाखांच्या वतीने गोवा येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लातूर व नांदेड शहरांतील सीए मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात सी.ए. उमेश शर्मा, विशाल पोद्दार, राधेश्याम बियाणी, मंगेश किनरे मार्गदर्शन करणार आहेत. यशस्वितेसाठी लातूर शाखेचे अध्यक्ष राजेश अग्रवाल, विशाल चव्हाण, आनंद काबरा परिश्रम घेत आहेत.