शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत जाणाऱ्या मुलींचा पाठलाग; दाेघांना सहा महिन्यांचा कारावास, लातूर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालचा निकाल

By राजकुमार जोंधळे | Updated: May 31, 2025 21:12 IST

दरम्यान, लातूर ग्रामीणचे डीवायएसपी सुनील गोसावी, मुरुडचे सपोनि. अशोक उजगरे यांनी या गुन्ह्याचा बारकाईने तपास करून आरोपीविराेधात सबळ पुरावे जमा करून लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

राजकुमार जाेंधळे / लातूर : शाळेत जाणाऱ्या मुलींचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या दाेघा आरोपींना सहा महिन्याचा करावास आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा लातूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी सुनावली.

पाेलिसांनी सांगितले, मुरुड पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेला दाेन मुली जात असताना, खासगी शिकवणीला जाता-येताना सातत्याने दाेघांनी पाठलाग करत विनयभंग केला. याबाबत मुरुड पाेलिस ठाण्यात २०२२ मध्ये अशोक शिवाजी अडसुळे (वय ३१) आणि बाळू उर्फ विजय भागवत लोहार (वय ३४, दाेघेही रा. बोरगाव काळे ता. लातूर) याच्याविराेधात गुन्हा दाखल केला हाेता.

दरम्यान, लातूर ग्रामीणचे डीवायएसपी सुनील गोसावी, मुरुडचे सपोनि. अशोक उजगरे यांनी या गुन्ह्याचा बारकाईने तपास करून आरोपीविराेधात सबळ पुरावे जमा करून लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. लातूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने कलम ३५४ (ड) भादंविप्रमाणे दाेघा आरोपींना दोषी ठरवत सहा महिन्यांचा कारावास आणि प्रत्येकी पाच हजारांचा दंड अशी शिक्षा ठाेठावली आहे. या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील प्रेमानंद डी. देडे यांनी युक्तिवाद केला.  

ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लातूर ग्रामीणचे डीवायएसपी सुनील गोसावी, सपोनि. अशोक उजगरे, कोर्ट ट्रायल मॉनिटरिंग सेलचे पोउपनि. रोहन पाटील यांनी केली. त्यांना कोर्टपैरवी इम्रान शेख, प्रेमला सगर यांनी सहकार्य केले.