लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : लोकसहभागातून ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर उभारण्यात येत असलेल्या लोकोपयोगी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला लातूरकरांनी सहाय्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले.
स्पंदनतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ‘स्पंदन’चे प्रमुख डाॅ. विश्वास कुलकर्णी, डाॅ. अशोक अरदवाड, डाॅ. वैशाली टेकाळे, संजय अयाचित, ॲड. संजय पांडे, आदी उपस्थित होते.
प्रा. शिवराज मोटेगावकर, मीनल मोटेगावकर, गुरूनाथ मगे, शिवदास मिटकरी, वामन भूमकर, संजय अयाचित, श्रीकांत हिरेमठ, अनंत देशपांडे, ॲड. कालिदासराव देशपांडे, साजीदभाई शेख, नाना भोयरेकर, मनोज सप्तर्षी, संजय प्र. अयाचित, डाॅ. कल्याण बरमदे, डाॅ. अजय जाधव, डाॅ. विक्रम राजपूत, ॲड. अण्णाराव पाटील, धर्मवीर भारती, नागनाथ गित्ते, स्नेहल उटगे, नामदेव काकडे यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन प्रकल्पाच्या मदतीचा धनादेश स्वीकारून त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमात जवळपास १० लाख रुपये जमा करण्यात आले. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनीही या प्रकल्पासाठी वैयक्तिक मदत जमा केली.
प्रास्ताविक डाॅ. विश्वास कुलकर्णी यांनी केले. यावेळी डाॅ. अशोक अरदवाड, डाॅ. वैशाली टेकाळे, ॲड. संजय पांडे, डाॅ. अजय जाधव, प्रा. मोटेगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय अयाचित यांनी केले तर शिरीष कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डाॅ. मधुकरराव कुलकर्णी, डाॅ. माया कुलकर्णी, डाॅ. अनुजा कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी उपस्थित होते.