शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

लातूर-जहिराबाद महामार्गावर रात्री  भरधाव कारची समोरासमोर धडक, प्रवासी जखमी

By राजकुमार जोंधळे | Updated: June 9, 2025 05:50 IST

Latur Accident News: लातूर-जहिराबाद महामार्गावर शिवणी पाटी येथे रविवारी रात्री भरधाव दोन कारची समोरासमोर जोराची धडक झाल्याची घटना घडली. कारमधील जखमींना स्थानिक नागरिकांनी दुसऱ्या वाहनातून लातूरला उपचारासाठी हलविले.

- राजकुमार जोंधळे लातूर - जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गावर गेल्या दोन आठवड्यापासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. लातूर-जहिराबाद महामार्गावर शिवणी पाटी येथे रविवारी रात्री भरधाव दोन कारची समोरासमोर जोराची धडक झाल्याची घटना घडली. कारमधील जखमींना स्थानिक नागरिकांनी दुसऱ्या वाहनातून लातूरला उपचारासाठी हलविले. अपघातात दोन्ही कारचे नुकसान झाले आहे.

निलंगा येथून लातूरकडे निघालेली आणि लातूरहून निलंग्याकडे जाणाऱ्या दोन्ही कारची शिवणी पाटी येथे रविवारी रात्री ९ वाजता समोरासमोर धडक झाली. या दोन्ही कारमध्ये तीन-तीन प्रवासी होते, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी औसा पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन रात्री १२ वाजता पाहणी केली.

लातूर-जहिराबाद महामार्ग अपघात मार्ग !गेल्या दोन आठवड्यामध्ये लातूर-जहिराबाद महामार्गावर मोठे चार अपघात झाल्याची नोंद आहे. आठवड्यातून किमान एक-दोन अपघात होत आहेत. हा महामार्ग ‘अपघात’मार्ग ठरत आहे. महामार्गावरील ब्लॅक स्पॉटमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. हे ब्लॅकस्पॉट दूर करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.

‘ब्लॅक स्पाॅट’मुळे अपघातात वाढ...निलंगा ते लातूर दरम्यान सर्वाधिक अपघात झाल्याची नोंद गेल्या वर्षभरात पोलिस दप्तरी आहे. यामध्ये जीवितहानीही मोठी झाली आहे. हे अपघात रोखण्यासाठी महामार्गावरील ब्लॅक स्पॉट दूर करण्याची गरज आहे. उदगीर मोड, निटूर, केळगाव, शिवणी पाटी, बाभळगाव आणि बाभळगाव नाका दरम्यान अपघात घडत आहेत.

महामार्गाला गेले तडे..!लातूर-जहिराबाद महामार्गाला तडे गेले असून, याबाबत स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी अनेकदा संताप व्यक्त केला आहे. मात्र हे तडे, पडलेल्या भेगा दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. या भेगांमुळे दुचाकींचे अपघात वाढले आहेत. शिवाय, चालकांचे नियंत्रणही सुटत असल्याचे वाहनधारकांनी सांगितले. 

रात्री घटनास्थळाची पाहणी...लातूर-जहिराबाद महामार्गावर बाभळगाव ते शिवणी पाटी दरम्यान दोन कारचा समोरासमोर अपघात झाल्याची माहिती रात्री उशिरा मिळाली. औसा ठाण्याच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या अपघातात दोन्ही कारचे नुकसान झाले आहे. जखमींची संख्या मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही. - सुनील रेजितवाड, पोलिस निरीक्षक, औसा

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर