यावेळी सर्वच बाधित रुग्ण नियमानुसार राहत असल्याचे आढळून आले. तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्यामार्फत तालुक्यातील होम आयसोलेशनमधील रुग्णांची पाहणी करण्यात आली. त्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, आशा स्वयंसेविका, पालिका कर्मचारी व बीएलओंचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते. सदरील पथकाने अचानक भेट देऊन होम आयसोलेशनमधील कोरोनाबाधितांची माहिती घेतली. यापुढेही सदरील मोहीम सुरु राहणार आहे. कोणी नियमाचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी दिली.
सदरील मोहिमेसाठी पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना मदत केली. तसेच तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रज्ञा कांबळे, संतोष धाराशिवकर, अव्वल कारकून जी. एम. चव्हाण, डी. आर. फुटाणे, रमेश रूद्देवाड यांनी सहकार्य केले. सदरील मोहिमेअंतर्गत रुग्ण व नातेवाईकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येऊन सूचना केल्या जात आहेत.