शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

बाजारात सोयाबीन गडगडले; तुरीच्या दरात उसळी !

By संदीप शिंदे | Updated: January 24, 2024 17:25 IST

सौदा न निघताच उदगीरच्या बाजारात शेतमालाची खरेदी

उदगीर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी सोयाबीनचा दर शासनाने घोषित केलेल्या ४ हजार ६०० रुपये क्विंटलच्या हमीदरापर्यंत खाली घसरला आहे. पुढील काळात हे दर आणखी घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर तूरीच्या दारात ५०० रुपयांनी वाढ झाली असून, बुधवारी उदगीर मार्केट यार्डमध्ये व्यापाऱ्यांनी सौदा न काढताच शेतमालाची खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली.

सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत आहे. मागील आठवड्यात ४ हजार ६५० रुपये असलेला दर या आठवड्यात ५० रुपयांनी घसरून ४ हजार ६०० पर्यंत खाली आला. खाद्य तेलाचे दर घसरत असल्याने व सोयाबीन पेंडीला मागणी नसल्यामुळे सोयाबीनचे दर भविष्यात आणखी कमी होतील अशी शक्यता आहे. तर तुरीच्या डाळीला सध्या मागणी असल्याने तुरीच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे.

मागील आठवड्यात तूर ९ हजार ३०० रुपये क्विंटल दराने विक्री होत होती. परंतू सुरु आठवड्यात तुरीच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ होऊन चांगल्या प्रतीच्या तुरीला ९ हजार ८०० रुपयापर्यंत दर मिळाला. उदगीरमध्ये सौद्याच्या वेळी समितीचे प्रभारी सचिव व हमालामध्ये बाचाबाची झाल्यामुळे सौदा निघाला नाही. सुरुवातीला बाजार बंद राहतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतू दुपारी व्यापाऱ्यांनी पोटलीचा दर काढून शेतमालाची खरेदी केली. जर सौदा निघाला असता तर बाजारात मोठ्या प्रमाणात आवक असलेल्या तुरीला चांगला दर मिळाला असता अशी भावना शेतकरी व्यक्त करीत होते. पुढील तीन दिवस मार्केट यार्ड श्री गुरु हावगीस्वामी यात्रेनिमित्त बंद राहणार असल्याने व्यापारी मागतील त्या दराने शेतमाल विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली.

तर मिळाला असता १० हजारांचा दर...बाजार समिती व हमालामध्ये झालेला वाद वेळीच मिटवला असता तर सध्या तुरीला दर १० हजारांवर मिळाला असता. त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान टळले असते. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याबाबत सर्वांनी दक्षता घेण्याची गरज असल्याचे आडत असोशिएशनचे अध्यक्ष श्रीधर बिरादार यांनी सांगितले. तर प्र.सचिव प्रदीप पाटील म्हणाले, बाजार समिती व हमालामध्ये आज गैरसमजातून वाद झालेला आहे. सौदा काढून शेतमालाचे वजन माप करून गावाकडे जाण्यास उशीर झाला असता म्हणून सौदा काढला नाही.

सद्यस्थितीत तूर विक्रीसाठी योग्य वेळ...सध्या बाजारात तुरीला दर चांगला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या दरात विक्री करण्यास हरकत नाही. दरवाढीची आशा करून तुरी विक्री विना ठेवल्यास घरी कीड लागणे, वजनात तूट येणे या प्रकारे नुकसान होण्याची शक्यता असते. सध्या मिळणारे दर हे शेतकऱ्यांसाठी समाधानकारक आहेत. खरीप हंगामात नुकसान झाले आहे. आता तूरीच्या विक्रीतून शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. सोयाबीनचे दर कमीच आहेत. त्यामुळे तूर विक्रीसाठी योग्य वेळ असल्याचे व्यापारी चंद्रकांत बिरादार यांनी सांगितले.

 

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र